पाणी चळवळ आता तरुणांनीच हाती घ्यावी - गणपतराव देशमुख

हुकूम मुलाणी
बुधवार, 27 जून 2018

मंगळवेढा - नागन्नाथ आण्णानी सुरु केलेली पाणी चळवळ आता तरुणांनीच हाती घ्यावी असे आवाहन गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केले. रौप्य महोत्सवी पाणी परिषद येथील यशवंत मैदानावर घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. 

मंगळवेढा - नागन्नाथ आण्णानी सुरु केलेली पाणी चळवळ आता तरुणांनीच हाती घ्यावी असे आवाहन गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केले. रौप्य महोत्सवी पाणी परिषद येथील यशवंत मैदानावर घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे, निमत्रंक वैभव नाईकवाडी आ भारत भालके, नगराध्यक्षा अरुणा माळी,लक्ष्मण ढोबळे, शरद पाटील, मायाक्का यमगर, बाबुराव गुरव, विश्‍वनाथ चाकोते, चेतन नरोटे, शिवाजीराव काळुंगे राहुल शहा, शैला गोडसे, चंद्रकांत देशमुख, अॅड बाळासाहेब बागवान, प्रा. बाळासाहेब नाईकवाडी, प्रकाश पाटील, कल्याणराव काळे, अॅड बिराप्पा जाधव, अ‍ॅड भारत पवार आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, म्हैसाळच्या योजनेतून या भागाला पाणी मिळावे म्हणून माजी मंत्री शिंदे यांनी ए.आय.बी.पी तून निधी दिला. पण त्या काळात हे काम झाले नाही. सध्या सरकारने ए.आय.बी.पी योजना बंद केली. नव्याने सुरु केलेल्या पंतप्रधान सिंचन योजनेमधून सहा टक्के दराने नाबाई करुन कर्ज रुपाने निधी उपलब्ध करुन दिला. राज्य सरकारने सुधारीत खर्चाला मंजुरी दिल्याने सांगोल्यातील 4 व मंगळवेढयातील 5 हजार क्षेत्राला पाणी मिळणार आहे. आज पाणी परिषदेतील या ठरावावर चर्चा करून गती देण्यासाठी दुष्काळी तालुक्यातील सर्व आमदाराला एकत्र करून विधीमंडळात प्रयत्न करणार पाण्यावर सगळंचा हक्क असल्याने देशाच्या विकासासाठी शेतीचा विकास महत्वाचा आहे म्हणून आता पाण्याची चळवळ आता तरुणानी हाती घ्यावी.

माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की आज देशातील साठ कोठी लोकांना पाणी मिळत नसल्याचा निती आयोगाचा अहवाल असून देशात पाणी असून केवळ नियोजन नाही या भागातील पाण्यासाठी चळवळ उभा करण्याचे काम स्व. आण्णांनी केले काही लोकांना डांगोरा पिटण्याची सवय आहे मी शांत पणे काम करणारा आहे मी आज सत्तेत नाही भविष्यात जरी संधी मिळाली तरी पाणी चळवळीच्या सोबत आहे.लोकप्रतिनिधी असताना  राज्यपालाची नियुक्ती माझ्यासही झाली असली तरी 35 गावाच्या पाण्यासाठी आ भालके सोबत मी राज्यपालाकडे गेलो.

निमंत्रक वैभव नाईकवाडी म्हणाले, एकजुटीच्या जोरावर टेंभू योजना मंजूर झाली एकजूट असेल निश्रि्चतपणे आपल्या मागण्या पुर्ण होतील. 26 योजना पुर्ण करण्यासाठी शासनाच्या हालचाली सुरू असून त्यास गती देणे आवश्यक आहे.पाणी संघर्ष चळवळीला दिली पाहिजे.ना.शिंदे यांनी पक्षापेक्षा जनतेला न्याय द्यावा.शेवटच्या टोकाला असलेल्या शेतकय्राला पाणी मिळवून प्रयत्न करण्याचे आवाहन केले आ भालके म्हणाले की 35 गाव उपसासिंचन योजना अनुशेषाचा मुददा असताना राज्यपालाकडून खास बाब म्हणून मंजुर करुन आणली पण सध्याच्या सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागली म्हैसाळचे पाणी पुढील महिना अखेर मिळणार असल्याने रखडलेली पुर्ण होणे आवश्यक आहे उजनी धरण पुर्ण क्षमतेने भरुन ही तालुक्याला पुरेसे पाणी मिळत नाही यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे,बाबुराव गुरव,शैला गोडसे,कल्याणराव काळे,शिवाजीराव काळुंगे यांची भाषणे झाली, प्रास्ताविक अ‍ॅड भारत पवार यांनी  केले सुत्रसंचालन व आभार इंद्रजित घुले यांनी मानले. 

रौप्य महोत्सवी पाणी परिषदेमध्ये खालील ठराव हात उंचावून करण्यात आले...  
1) म्हैसाळ उपसा योजनेचे मंगळवेढा व सांगोल्यास पाणी मिळणे..
2)मंगळवेढा, पंढरपूर , मोहोळ, या तालूक्याला उजनीचे पाणी पुर्ण पणे मिळावे.
3) भिमा, माण, कोरडा नदीला कालव्याचा दर्जा मिळावे.
4) पाण्याचे समन्यायी वाटप.
5) मंगळवेढा 35 गाव उपसा सिंचन योजनासाठी पुरेसा निधी देऊन पुर्ण करावे.
6) 13 दुष्काळी तालुक्यातील प्रकल्पासाठी निधी देवून पुर्ण करण्यात यावे.
7) चितळे जल आयोग सरकारने समन्यायी पाणी वाटप प्रत्यक्षात आणावे.
8) राज्यातील सर्व शेतकर्‍यांना कर्जमाफी देऊन त्यांचे उतारे कोरे करण्यात यावेत.
9) शासनाने प्रायोगिक तत्त्वावर टेंभु योजनेवर सौरउर्जा प्रकल्प घेतला आहे त्यास निधी देऊन त्यावर सौरउर्जा प्रकल्प उभे करावेत.
10) शेतकर्‍यांच्या परिस्थितीची गंभीर दखल घेऊन केंद्र सरकारने व राज्य शासनने त्वरीत उपाययोजना करावी.
11) अतिरिक्त साखर , अतिरिक्त दुध व अतिरिक्त शेतमाल परवडणार्या दराने निर्यात व्हावा. त्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात अनुदान द्यावे .
12) टेंभु योजनेस क्रांतिवीर डॉ. नागनाथआण्णा नायकवाडी यांचे नांव देण्यात यावे असे अनेक ठराव एकमुखाने घेण्यात आले.

Web Title: Young people should take water movement now - Ganpatrao Deshmukh