तरुण बेरोजगारांना मार्गदर्शन मिळाल्यास प्रगती निश्चित : वाघमारे

राजकुमार शहा
शनिवार, 14 एप्रिल 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील तरूण घडविण्यासाठी आजच्या तरूण बेरोजगारांचे कौशल्य ओळखून त्यांना योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळाल्यास त्याची प्रगती निश्चित होईल, असे प्रतिपादन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शंकरराव वाघमारे यांनी केले. 

मोहोळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील तरूण घडविण्यासाठी आजच्या तरूण बेरोजगारांचे कौशल्य ओळखून त्यांना योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळाल्यास त्याची प्रगती निश्चित होईल, असे प्रतिपादन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शंकरराव वाघमारे यांनी केले. 

दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेंतर्गत सौंदणे ता मोहोळ येथे शंकरराव वाघमारे मित्रमंडळ, श्री संत सावता माळी प्रतिष्ठान यांच्यावतीने बेरोजगार मेळावा आयोजित प्रसंगी ते बोलत होते. दहावी, बारावी शिक्षण असलेल्या व रोजगाराची गरज असलेल्या तरूण तरूणीना पुणे येथे तीन महिने मोफत प्रशिक्षण देऊन नोकरीसाठी त्यांना तयार केले जाते. दरम्यानच्या काळात मुलामुलीना स्वतंत्र निवास व्यवस्था देऊन तिथे त्यांची जेवनासह संपूर्ण नि:शुल्क सोय करत प्रशिक्षित केले जाते. तिन महिन्यानंतर त्यांना प्रमाणपत्रासह नोकरी मिळवून देण्यात येते .

या मेळाव्यासाठी  पाचशेहून बेरोजगारांनी नोंदणी करून प्रत्यक्ष उपस्थित राहिले होते. तर 150 बेरोजगारांनी पुणे येथील प्रशिक्षण वर्गाला जाण्यासाठी आपले फॉर्म भरून दिले. मेळाव्यानंतर लगेचच पहिल्या पंचवीस जणांची तुकडी पुण्याला प्रशिक्षणासाठी रवाना झाली. प्रास्ताविक खासदार प्रतिनिधी संतोष नामदे यांनी केले. यावेळी कालीदास पाटील, सरपंच रमेश माने, सोमनाथ माने, शाम गोडसे,  सुरज पवार, पंचाक्षरी स्वामी, सिघ्दाराम म्हमाने, कुमार गोडसे, लक्ष्मण कृपाळ, श्रीमंत शिंदे, अमीन मुल्ला, अण्णा गोडसे , अमीन मुल्ला, विठ्ठल वाघमारे, तानाजी नामदे  आदी उपस्थित होते 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोरख भानवसे, रमेश भानवसे, तुकाराम भानवसे, धनंजय भानवसे आदीनी परिश्रम घेतले. या बेरोजगार मेळाव्याच्या माध्यमातून दीडशे जणांचा रोजगाराचा प्रश्न सुटला.

Web Title: Young Peoples Guidance will Improvement Sure says Waghmare