पेठवडगावच्या युवकाचा कऱ्हाडजवळ निर्घृण खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

स्वप्नीलचे दोन्ही हात चिकटपट्टीने बांधले होते. त्याच्या गळ्यावर खोलवर वार असून, अन्यत्र खून करून त्याचा मृतदेह मालखेड येथील उसाच्या शेतात टाकला असावा, अशीही शक्‍यता पोलिस वर्तवत आहेत. स्वप्नीलच्या खिशात सापडलेल्या मोबाईलवरून त्याची ओळख पटली आहे. 

कऱ्हाड - पेठवडगाव येथील युवकाचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. हा प्रकार रात्री आठच्या सुमारास उघडकीस आला. स्वप्नील सुतार (वय २२, रा. पेठवडगाव, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे.

स्वप्नीलचे दोन्ही हात चिकटपट्टीने बांधले होते. त्याच्या गळ्यावर खोलवर वार असून, अन्यत्र खून करून त्याचा मृतदेह मालखेड येथील उसाच्या शेतात टाकला असावा, अशीही शक्‍यता पोलिस वर्तवत आहेत. स्वप्नीलच्या खिशात सापडलेल्या मोबाईलवरून त्याची ओळख पटली आहे. 

स्थानिक ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर व त्यांचे पथक त्वरित घटनास्थळी आले. त्यानंतर पोलिसांनी सांगितले, की स्वप्नीलच्या गळ्यावर खोलवर वार आहे. त्यामुळे त्याचा खून झाला आहे. त्याची ओळख पटत नव्हती. रात्री आठच्या सुमारास तो मृतदेह येथील स्थानिक ग्रामस्थांच्या नजरेस आला; पण त्याचा खून नेमका कोठे झाला, त्याचा माग अद्यापही लागलेला नाही.

सुरवातीला त्याची ओळख पटविण्याचे आव्हान होते; पण मृतदेहाची तपासणी केल्यावर त्याच्या खिशात सापडलेल्या मोबाईलवरून त्याचे नाव स्वप्नील सुतार असल्याचे समजले. त्याचा खून करून मृतदेह मालखेड रस्त्यावर टाकण्यात आला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची सूत्रे गतीने हलवली आहेत.

हॉटेलमध्ये होता कामाला
पेठवडगाव : येथील स्वप्नील गणेश सुतार याच्या खुनाची बातमी समजताच त्याच्या मोठा नातेवाईकांना धक्का बसला. त्याचा हॉटेल मॅनेजमेंट कोर्स झाला होता. तो पुणे येथे एका हॉटेलमध्ये कामास होता. तो, आठवड्यातून एकदा घरी येत होता. त्याने नेहमी प्रमाणे रविवारी घरी येणार असल्याचे फोनवरून कळवले होते; पण तो आला नाही. आज कऱ्हाड पोलिसांचा फोन आल्यानंतर नातेवाईकांना त्याच्या खुनाची माहिती कळाली. त्याच्या मागे आई-वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. त्याच्या घरची परिस्थिती गरिबीची असून वडील एका खासगी सूतगिरणीत कामास आहेत.

Web Title: youngster Murder near Karad