अशी ही माणुसकी; महापूरात खांद्यावरुन नेला अनोळखी मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

मुरगूड : वेदगंगेच्या महापूरातून अनोळखी पुरुषाचा मृतदेह वाहून येवून फोंडा - निपाणी राज्यमार्गावर यमगे ( ता.कागल ) येथे अडकला होता. पण हा मृतदेह पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी मुरगूड ग्रामीण रुग्णालयात नेहण्यासाठी ऐनवेळी कोणतेही वाहन उपलब्ध होणार नसल्याने यमगेतील काही धाडसी तरुणांनी कुजलेल्या आवस्थेतील तो मृतदेह लोखंडी तडकीच्या सहाय्याने खांद्यावरून दोन किलोमीटर अंतर सुमारे पाच फूट महापूरातून नेऊन माणूसकीचे दर्शन घडविले.

अधिक माहिती अशी, गेल्या आठ दिवसापासून वेदगंगेला आलेल्या महापुराचे पाणी फोंडा -निपाणी मार्गावरील निढोरीपासून सुरुपली पर्यंत रस्त्यावरच आल्याने हा मार्ग पूर्णतः बंदच होता. पूर ओसरण्यास सुरुवात झाली आणि यमगे शिंदेवाडी दरम्यानच्या यमगे कडील पुलाजवळ पुराच्या पाण्यात एक मृतदेह तरंगत असलेला काही युवकांनी पाहिले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली.

मुरगूड पोलिसांना माहिती देण्यात आली. तसे पोलिसही पोहचले. तो मृतदेह पाण्यातून बाहेर काढला खरा पण उत्तरीय तपासणीसाठी तो मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात नेहण्याचा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला.

गावात एखादे वाहन मिळते काय? याचा शोध सुरु झाला. ट्रॅक्टर, ट्रक अशी शंभर हुन अधिक वाहने असताना देखील मृतदेह नेहण्यास एकही वाहन मिळाले नाही.
शेवटी घटनास्थळावरील पोलिस पाटील किरण भाट, प्रमोद पाटील सरनोबत, अनिल पाटील, सुशील पाटील, वैभव पोवार, आकाश चावरे, सूरज कोंडेकर, महेश परीट, आणि युवराज पाटील या तरुणांनी गावातील लोखंडी तडकी आणून ते प्रेत गोणपाटात बांधले आणि तडकीवर ठेवले. 

खांद्यावरून पुराच्या पाण्यातून मुरगूडकडे नेऊ लागले. सुरवातीला पाणी कमी होते. पण शिंदेवाडीजवळील ओढ्यावर हे पाणी छाती एवढे होते. पण या पाण्यातूनच तो मृतदेह सुमारे दोन किलोमीटर जीवाची बाजी लावत नेण्यात आला. या तरुणांसोबत सहाय्यक फौजदार मधकुर पाटील, स्वप्नील मोरे हे पोलीस कर्मचारी देखील होते. महापूरात सडलेल्या मृतदेहाला प्रचंड दुर्गंधी सुटली होती. पण त्याची पर्वा न करता या तरुणांनी धाडसाने या अनोळखी मृतदेहाला खांदा देत जपलेली माणुसकी निश्चितच प्रेरणादायी आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youngsters carried an anonyms deadbody through flood on shoulders