मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या युवकाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

सातारा - येथील अल्पवयीन मुलाचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार आज उघडकीस आला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी लक्ष्मण गोरख पिठेकर (वय 25, रा. नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा) यास अटक केली. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पीडित मुलगा हा आठ वर्षांचा आहे. हा मुलगा काल (ता. 20) शाळेजवळ खेळत होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास पिठेकर तेथे गेला. त्याने पीडित मुलाला हाक मारली. "तुझ्या वडिलांनी बोलावले आहे', असे सांगून त्याने त्याला ओढ्याजवळ नेले. तेथे त्याने त्याच्याशी लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर मुलाला धमकावून तेथून तो पसार झाला. 

झालेल्या प्रकारामुळे मुलगा खूप घाबरला होता. तो कोणाशीही बोलत नव्हता. संशयिताच्या कृत्याचा त्याला त्रास होवू लागला. त्यानंतर कुटुंबीयांनी विश्‍वासात घेऊन त्याला बोलते केले. त्यानंतर हा धक्‍कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर कुटुंबीयांनी आज पोलिसांकडे धाव घेतली. घडलेल्या घटनेची माहिती व मुलाने संशयिताचे वर्णनही केले. त्यानुसार शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने मुलाने सांगितलेल्या वर्णनावरून संशयित पिठेकरला अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक किर्दत तपास करत आहेत. 

Web Title: The youth arrested for sexual abuse has been arrested