नववीत शिकणाऱ्या मुलीवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

अशी हि चर्चा 
कृष्णा व नववीतील मुलगी यांचे आधीपासूनच प्रेम होते. कृष्णा हा गवंडीकाम करतो. याची कुणकुण घरच्यांना लागताच त्यांनी या प्रेमाला विशोध दर्शविला. तसेच या सर्व गोष्टी येथेच थांबवण्यासाठी दबाव देखील टाकण्यात आला. या सर्व घटनांमुळे कृष्णाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे चर्चा परिसरात सुरु होती. जत पोलिस घटनेचा तपस करत असून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु आहे.

जत : प्रेमप्रकरणातून मुलाने नववीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीवर ब्लेडने वार करत स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कृष्णा पिसाळ ( वय २४ ) असे हल्ला करणाऱ्या मुलाचे नाव असून मानेवर ब्लेडचा वर्मी घाव बसल्यामुळे मुलगी गंभीर जखमी झाली  आहे तर मुलानेही स्वतःचा गळा चिरून घेतल्यामुळे तो देखील गंभीर आहे. दोघांवरही मिरज येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि,  नववीतील मुलगी हि शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना कृष्णा याने मुलीला अडवले या वेळी झालेल्या बाचाबाचीनंतर कृष्णाने मुलीच्या गळ्यावर ब्लेडने वार केला. शाळा व घर याच्या दरम्यान हा हल्ला झाल्यामुळे परिसरात तारांबळ उडाली. मुलीला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले तर थोड्याच वेळात मुलानेही स्वतः अत्म्हत्या करण्याच्या उद्देशाने स्वतःचा गळा चिरून घेतला. 

अशी हि चर्चा 
कृष्णा व नववीतील मुलगी यांचे आधीपासूनच प्रेम होते. कृष्णा हा गवंडीकाम करतो. याची कुणकुण घरच्यांना लागताच त्यांनी या प्रेमाला विशोध दर्शविला. तसेच या सर्व गोष्टी येथेच थांबवण्यासाठी दबाव देखील टाकण्यात आला. या सर्व घटनांमुळे कृष्णाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे चर्चा परिसरात सुरु होती. जत पोलिस घटनेचा तपस करत असून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु आहे.

Web Title: youth attacked girl in Jat