सुशीलकुमार शिंदेंना डावलल्याने युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा निषेध

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 19 जुलै 2018

सोलापूर : कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सुशीलकुमार शिंदे यांना स्थान न मिळाल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी व त्यांच्या टीमचा निषेध केला. मात्र चूक ध्यानात आल्यावर "निषेध' नाही "नाराजी' अशी दुरुस्ती करत घोषणाबाजी केली. काही कार्यकत्त्यांनी कुंडे फोडून राग व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी आपल्या सदस्यत्वाचे राजीनामेही शहराध्यक्षांना दिले. 

शिंदे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र कार्यकर्त्यांची ही अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे युवक कांग्रेसचे कार्यकर्ते सकाळी साडेअकराच्या सुमारास एकत्रित जमले व त्यांनी शिंदेंच्या समर्थनार्थ घोषणा देण्यास सुरवात केली. घोषणाबाजी झाल्यानंतर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष बाबा करगुळे यांनी,शिंदेंना डावलल्यामुळे कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आहेत, असे सांगितले. त्याचवेळी शिंदेंना डावलल्याबद्दल निषेध ही व्यक्त केला. त्यावेळी, राहूल गांधींचा निषेध का, असे विचारले असता, बोलण्यातली चूक त्यांच्या ध्यानात आली आणि "निषेध' नाही, "नाराजी' असे स्पष्टीकरण केले. 

दरम्यान, घोषणाबाजी संपल्यानंतर काही कार्यकर्ते भवनात जात होते. त्यावेळी एका कार्यकर्त्याने कुंडी फोडली. ती पाहून दुसऱ्याला चेव आला, त्यानेही कुंडी फोडली. एकामागोमाग तीन चार कुंड्या फोडण्यात आल्या. हा प्रकार कांग्रेसच्या संस्कृतीत बसत नाही, अशी विचारणा केली असता, युवक कॉंग्रेसच्या युवकांमध्ये जल्लोष आहे, त्यातून हा प्रकार घडला असे स्पष्टीकरण देण्यात आले. 

कार्यकर्त्यांनी केलेला प्रकार चुकीचा आहे, मात्र कुंडे त्यांनी फोडले नाहीत. आंदोलनात काही समाजकंटक सहभागी झाले होते, त्यांनी कुंडे फोडले आहेत. राजीनामे स्वीकारले असून ते प्रदेश कांग्रेसकडे पाठविण्यात येतील. 
- प्रकाश वाले, शहराध्यक्ष 
सोलापूर शहर-जिल्हा कॉंग्रेस समिती 

Web Title: youth congress protest for rejecting sushilkumar shinde in congress executive committee