युवक काँग्रेसची पहिल्या टप्प्यात 32 हजारांची नोंदणी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

निरीक्षक हंसपाल विष्ठ व गोपी चव्हाण यांच्याकडे जमा झालेले अर्ज जमा करण्यात आले. शहर जिल्ह्यातून या युवक कॉंग्रेस सभासद नोंदणी प्रचंड असा प्रतिसाद मिळाला असून अंदाजे 32 हजार 500 सभासद नोंदणी झाली.

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्हा युवक कॉंग्रेस च्या अध्यक्ष व पदाधिकारी निवडणुकीसाठी ऑफलाईन सभासद नोंदणी सोमवारी संपली. पहिल्या टप्प्यात 32 हजार 500 सदस्यांनी नोंदणी केली आहे. ऑनलाईन नोंदणी 16 जुलैपर्यंत सुरु राहणार असून, आणखीन 20 हजार सदस्य वाढण्याची शक्‍यता आहे. 

निरीक्षक हंसपाल विष्ठ व गोपी चव्हाण यांच्याकडे जमा झालेले अर्ज जमा करण्यात आले. शहर जिल्ह्यातून या युवक कॉंग्रेस सभासद नोंदणी प्रचंड असा प्रतिसाद मिळाला असून अंदाजे 32 हजार 500 सभासद नोंदणी झाली.

यावेळी प्रदेश युवक कॉंग्रेस सरचिरणीस विनोद भोसले, युवक शहर अध्यक्ष अंबादास करगुळे, प्रदेश सरचिटणीस राहुल वर्धा, नितीन नागणे, गणेश डोंगरे, गौरव खरात, सैफन शेख, पंडित सातपुते, गंगाधर बिराजदार, शंकर सुरवसे, सुशील म्हेत्रे, प्रवीण जाधव, विवेक खन्ना, दत्ता टापरे, भाऊ वाघ, पिंटू भोसले, गोविंद कांबळे, राजासाब शेख, तिरुपती परकीपंडला, युवराज जाधव, अजयसिंह इंगवले, राहुल गोयल यांच्यासह हजारो युवकांनी आपले सभासद नोंदणी केले. 

Web Title: Youth congress registration in Solapur