आत्मदहन केलेल्या नगरमधील तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

नगर - कर्जत येथील दावल मलिक देवस्थानाच्या जागेतील अनधिकृत बांधकाम काढण्याच्या मुद्द्यावरून आत्मदहन करणाऱ्या तौसिफ शेख याचा पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला, त्यामुळे मुस्लिम समाज आक्रमक झाला असून, शेख याच्या आत्मदहनास जबाबदार असणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, त्याबाबत तातडीने कारवाई न झाल्यास तीन जानेवारी २०१९ रोजी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा अहमदनगर शहर मुस्लिम समाजातर्फे प्रशासनाला देण्यात आला.

कर्जत येथील दावल मलिक देवस्थानाच्या जागेतील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलने करूनही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ तौसिफ शेख या तरुणाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहन केले. गंभीर भाजलेल्या अवस्थेत त्याला काल आधी जिल्हा रुग्णालयात व नंतर पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असताना आज त्याचा मृत्यू झाला.

Web Title: Youth death by Self combustion