सोलापूर : ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

dead.jpg
dead.jpg

सोलापूर : भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास बाळे क्रॉस रस्त्यावर घडली.

मल्लिनाथ शिवानंद हेब्बाळे (वय 30, रा. बीएसएनएल कॉलनी, सात रस्ता, सोलापूर) असे मृताचे नाव आहे. मल्लिनाथ हे आपल्या दुचाकीवरून (एमएच 12-ईव्ही 8183) बार्शी रस्त्याने सोलापूरकडे येत होते. बाळे क्रॉस रस्ता या ठिकाणी भरधाव ट्रकने (एमपी 15-एचए 0848) मल्लिनाथ यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात मल्लिनाथ हे गंभीर जखमी झाले.

दरम्यान, त्यांना पोलिसांनी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. मल्लिनाथ यांचे वडील शिवानंद हे बीएसएनएलचे अधिकारी असल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com