युवकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

केळघर : ओखवडी ( ता. जावली) येथील युवक रविंद्र शंकर शेलार वय 3८याचा टाकीतून पाणी काढायला गेला असता टाकीत पडून अपघाती मृत्यू झाला.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी नऊच्या सुमारास घराच्या जवळच असणाऱ्या सार्वजनिक पाण्याच्या टाकीवर पाणी काढण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो तोल जाऊन पाण्याच्या टाकीत पडला.

ही बाब लक्षात येताच रविंद्रच्या घरच्या लोकांनी उंच असणाऱ्या टाकीकडे धाव घेतली असता रविंद्र पाण्याच्या टाकीत पडलयाचे निदर्शनास आहे. ग्रामस्थांनी धाव घेत टाकीतून बाहेर काढून वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यास उपचारासाठी केळघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तेथून पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मेढा येथे दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत रविंद्रची प्राणज्योत मालवली होती.

रविंद्रच्या पश्चात पत्नी रुपाली, मुलगा पारस (वय १२) , प्रणित (वय ६ वर्षे) व दोन भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Youth drowned in water at Kelghar