तुमच्या मुलीसोबत लग्न करायचे आहे, तुम्हाला काही अडचण आहे का? 

girl
girl

सोलापूर : सतरा वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून छेड काढली. मुलीच्या वडीलांनी जाब विचारल्यानंतर तुमच्या मुलीसोबत लग्न करायचे आहे, तुम्हाला काही अडचण आहे का असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी केली. याप्रकरणी अस्लम शेख (रा. मित्र नगर, शेळगी, सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पिडीत मुलीच्या वडीलांनी जोडभावी पेठ पोलिसात फिर्याद दिली आहे. शेळगी परिसरात परिसराऱ्या व्यक्तीची सतरा वर्षीय मुलगी बारावीमध्ये शिकायला आहे. ती 18 फेब्रुवारी रोजी घरात रडत होती. वडीलांनी चौकशी केल्यानंतर अस्लम हा मुलगा गेल्या सहा महिन्यापासून फोन करून त्रास देत असल्याचे समजले. तो नेहमीच तिचा पाठलाग करणे, घरासमोरून फेऱ्या मारून छेड काढत असल्याचेही तिने सांगितले.

19 फेब्रुवारी रोजी मुलीच्या वडीलांना अस्लम यास फोन केला. तु माझ्या मुलीला का त्रास देत आहेस असा जाब विचारला. अस्लम याने मला तुमची मुलगी आवडते, मला तिच्यासोबत लग्न करायचे आहे. तुम्हाला याबाबत काही अडचण आहे का? असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी केली. मुलीच्या वडीलांना बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिसात अस्लम याच्या विरोधात विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com