युवकाच्या प्रसंगावधानामुळे टळला रेल्वे अपघात

राजकुमार शहा 
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

आरेकर यांच्या लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी युध्दपातळीवर हालचाल करून मुंडेवाडी येथील स्टेशन मास्तरला ही घटना सांगितली व येणारी सुपरफास्ट रेल्वे स्टेशनवरच थांबविण्याची सुचना दिली. त्या प्रमाणे रेल्वे स्टेशन वरच थांबली रेल्वे रुळ तुटल्याचे आरेकर यांच्या लक्षात आले नसते तर रेल्वे पुलावरून खाली पडुन मोठी जीवीत हानी झाली असती.

मोहोळ : भांबेवाडी (ता. मोहोळ) येथील एका 30 वर्षीय युवकाच्या प्रसंगावधानाने रेल्वेचा मोठा अपघात टळला. अपघात झालाच असता तर मात्र मोठी जीवीत हानी झाली असती त्याने दाखविलेल्या या प्रसंगावधनाबदल येत्या 15 ऑगस्टला रेल्वे विभागाकडुन त्याला सन्मानित करून अॅवॉर्ड देण्यात येणार आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी, की भांबेवाडी (ता. मोहोळ) येथील रामचंद्र हनुमंत आरेकर हे रेल्वेच्या इंजीनिअरींग विभागात कार्यरत आहेत. 26 जुलै रोजी आरेकर हे रेल्वे रूळ तपासत असताना मुंडेवाडी हद्दीतील सिना नदीवरील रेल्वे पुलावर दगड क्र 431/7/8 या ठिकाणी रेल्वे रूळ तुटल्याचे (एसीजी) निदर्शनास आले. त्याच पुलावरून थोडया वेळात पुणे-भुवनेश्वर ही सुपरफास्ट रेल्वे गाडी जाणार होती.

आरेकर यांच्या लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी युध्दपातळीवर हालचाल करून मुंडेवाडी येथील स्टेशन मास्तरला ही घटना सांगितली व येणारी सुपरफास्ट रेल्वे स्टेशनवरच थांबविण्याची सुचना दिली. त्या प्रमाणे रेल्वे स्टेशन वरच थांबली रेल्वे रुळ तुटल्याचे आरेकर यांच्या लक्षात आले नसते तर रेल्वे पुलावरून खाली पडुन मोठी जीवीत हानी झाली असती.

आरेकर यांच्या या प्रसंगावधानाबद्दल येत्या 15 ऑगस्टला रेल्वे विभागातर्फे त्यांना सन्मानीत करण्यात येणार असून तशा आशयाचे पत्र आरेकर यांना आले आहे. 

Web Title: youth inforn railway department for damage railway line in Solapur