प्रियसीच्या नादी लागतो म्हणून एकावर चाकूने वार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

कऱ्हाड : प्रियसीच्या नादाला लागू नको, असे सांगूनही न एकल्याने युवकावर त्याच्या मित्राने चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. येथील बुधवार पेठेत काल रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. हर्षल गोपाल भुर्के (रा. शुक्रवार पेठ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या मानेसह पोटावर व हातावर वार केले आहेत. श्रीकांत तपासे उर्फ चिक्या (रा. बुधवार पेठ) असे हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. जखमीवर सह्याद्री हॉस्पीटलमध्ये अतीदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, श्रीकांत तपासेचे एक मुलीबरोबर प्रेम संबंध होते. मात्र, ते संबंध त्या मुलीने तोडले होते. त्यानंतर ती हर्षल भुर्केशी प्रेम करू लागली. त्यामुळे काही दिवसांपासून मुलीच्या प्रेमप्रकरणावरून हर्षल व श्रीकांत यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते. त्यांच्यात अधून-मधून किरकोळ वादही होत होते. काल रात्री हर्षल त्याचा मित्र दिनेश यादवसह जेवणासाठी बाहेर बाहेर गेला होता. तेथून आल्यानंतर प्रभात टॉकीज जवळील पानपट्टीवर येवून दोघेही थांबले. त्यावेळी दिनेश यादव पानपट्टीकडे गेला. त्याचवेळी तेथे आलेल्या श्रीकांतने हर्षलशी वाद घातला. कित्येकदा सांगून सुद्धा तू माझ्या प्रियसीचा नाद सोडत नाहीस, तुला आता ठेवतच नाही असे म्हणून त्याने हर्षलच्या मानेवर पोटावर व हातावर चाकूने वार केले. 

त्यात हर्षल गंभीर जखमी झाला. श्रीकांतला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो तेथून पळून गेला. त्यानंतर दिनेश यादव यांनी जखमी हर्षलला उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटल मध्ये दाखल केले. पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड या प्रकरणाचा तपास करत आहेत.
 
Web Title: youth injured in knife attack