बेळगाव : कोगनोळीजवळ अपघातात नवलिहाळचा युवक ठार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

कोगनोळी - येथील राष्ट्रीय महामार्गावरील सेल्स टॅक्‍स नाक्‍यावर झालेल्या अपघातात नवलिहाळ (ता. चिक्कोडी) येथील युवक ठार झाला. ही घटना मंगळवारी (ता. 13) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. विनायक खडे (वय 30) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, विनायक खडे हे आपली नवी दुचाकी-हिरो एचएफ (नंबर नसलेली) मोटरसायकल घेऊन कागलहून निपाणीकडे जात होते. येथील सेल्स टॅक्‍स नाक्‍यावर अनोळखी वाहनाने दुचाकीला मागील बाजूने धडक बसल्याने विनायक यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी डीवायएसपी मिथुनकुमार, सीपीआय संतोष सत्यनाईक, निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार बी. एस. तळवार व सहकाऱ्यांनी यांनी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर निपाणीतील महात्मा गांधी रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth killed in accident near Koganoli