नाजूक प्रकरणातून आजरा तालुक्यात युवकाचा खून; एक जखमी

Youth Murder Incidence in Uttur Ajara Taluka Kolhapur News
Youth Murder Incidence in Uttur Ajara Taluka Kolhapur News

आजरा ( कोल्हापूर ) : तालुक्यातील उत्तूर फाट्यानजीक युवकांच्या दोन गटात मारामारी झाली. यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे. 

अभिषेक जयवंत सावर्डेकर (वय १९, रा. मासेवाडी ता. आजरा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर हरिष ईराप्पा तोरगले (वय २०, रा. मासेवाडी ता. आजरा) असे जखमीचे नाव आहे. नाजूक प्रकरणातून ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास युवकांमध्ये राडा झाला. 

प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत व जखमी हे दोघे मोटारसायकलवरून आजर्‍याकडे येत होते. त्याच दरम्यान उत्तूर फाट्यानजिक २० ते २५ युवकांच्या टोळक्याने त्यांना अडविले. यानंतर या दोन्ही गटात संबंधित नाजूक प्रकरणावरून जोरदार वादावादी झाली. यातून युवकांच्या टोळक्यातील एकाने कुकरी सारख्या धारदार हत्याराने अभिषेकला भोसकले. त्याच्या पोटावर वार केले. यात अभिषेक गंभीर जखमी झाला. अभिषेक सोबत असणाऱ्या हरिषला सुध्दा मारहाण केली. यामध्ये तो ही जखमी झाला आहे. 

अभिषेकला उपचारासाठी भादवण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर एका खासगी रूग्णालयात दाखल केले. पण उपचारा दरम्यान अभिषेकचा मृत्यू झाला.

या प्रकरणात आजरा तालुक्यातील घाटकरवाडी परिसरातील युवकांची नावे पुढे येत आहेत. त्यामुळे पोलीस चौकशीसाठी संशयितांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, घटनास्थळी रक्ताचे थारोळे पडले होते. याठिकाणी एका व्यक्तिचे चप्पल पडल्याचे पोलीसांना आढळले. सायंकाळी पाच वाजता गडहिंग्लज विभागाचे डी. वाय .एस. पी. अंगद जाधवर यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

अभिषेक हा अभियंता होता. त्याचे वडील मुंबईत चालक म्हणून काम करतात. आई आशा स्वयंसेविका आहे. एकूलता एक मुलगा गेल्याने सावर्डे कुटूंबावर दुखाःचा डोंगर कोसळला आहे. 

दोडामार्ग तालुका गोव्यात विलिनकरण्याच्या चर्चेचे अंतरग संबंधीत बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com