सांगलीत युवकाचा चाकूने भोसकून खून 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

सांगली - येथील न्यू टिंबर एरियात भांडण सोडवायला गेलेल्या युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. आदर्श ऊर्फ नरसू मल्हारी वाघमारे (वय 18, न्यू टिंबर एरिया) असे त्याचे नाव आहे. भाऊबिजेच्या रात्री हा प्रकार घडला. नरसूचा खून झाल्याने त्याची मतिमंद मोठी बहीण पोरकी झाली. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर नरसूनेच तिचा सांभाळ केला होता. 

दरम्यान, या खून प्रकरणी मुख्य संशयित आरोपी संतोष दादासाहेब ठोकळे (न्यू टिंबर एरिया) याला अटक करण्यात आली आहे. त्याचे साथीदार नितीन बाळू ठोकळे आणि सोनू ऊर्फ योगेश रवी पाटील हे पसार झाले आहेत. विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नरसू काल रात्री घरी झोपला होता. साडेनऊच्या सुमारास त्याच्या मित्राने गल्लीत भांडण सुरू आहे, बघायला चल म्हणून त्याला उठवून नेले. भीमकट्टा येथे संतोष ठोकळे व त्याचे साथीदार मद्यपान करून बसले होते. तेथून वृद्ध अक्काताई सनदी घराकडे निघाल्या होत्या. संतोषने त्यांना शिवीगाळ केली. त्यातून अक्काताई, त्यांचा नातेवाईक सूरज सनदी यांनी संतोषला जाब विचारला. भांडण जोरात जुंपले. हाणामारी सुरू झाली. त्यात नरसूने मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतोषने चाकू काढून त्याला धमकावले. नरसूने अक्काताईची बाजू घेतली. त्या रागातून संतोषने नरसूच्या छातीवर चाकूचा जोरदार वार केला. चाकूचा हृदयावर वर्मी घाव बसल्याने नरसू तेथेच कोसळला. शेजारील रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा श्‍वास थांबला. या प्रकारानंतर संतोषचे साथीदार योगेश व नितीन पळून गेले. या भांडणात संतोषलाही चाकू लागला. तो तसाच विश्रामबाग पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याला वसंतदादा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

बहीण पोरकी.. 
नरसूची आई सुनीता वाघमारे या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. तीन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. नरसू लहान असताना वडील वारले. मोठा भाऊ आणि मतिमंद बहिणीसह तो रहात होता. बहिणीचे सारे तोच करायचा. वाडपी म्हणून काम करायचा. दिवाळीआधी गवंड्याच्या हाताखाली कामाला जाऊन स्वतःला, बहिणीला नवे कपडे खरेदी केले होते. त्याच्या मृत्यूने ती पोरकी झाली. आज पहाटे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नरसू निपचित पडलेला पाहून ती बिथरली होती. 

धडपड्या, निष्पाप 
नरसूच्या मृत्यूने न्यू टिंबर एरियातील घर अन्‌ घर हळहळत आहे. निष्पाप अन्‌ धडपड्या म्हणून त्याची ओळख होती. आईच्या सामाजिक कार्याचा आदर्श तो चालवत होता. दुसऱ्याच्या भांडणात पडून एका वृद्धेची बाजू त्याने घेतली. त्यातच त्याचा जीव गेला, असे महिलांनी सांगितले. 

Web Title: youth murder in Sangli