साताऱ्यात युवकाचा जुन्या वादातून खून 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

सातारा - येथील मंगळवार पेठेत राहणाऱ्या युवकाचा रात्री जुन्या भांडणाच्या कारणातून खून करण्यात आला आहे. 

सातारा - येथील मंगळवार पेठेत राहणाऱ्या युवकाचा रात्री जुन्या भांडणाच्या कारणातून खून करण्यात आला आहे. 

संदीप रमेश भणगे (वय 35, रा. व्यंकटपुरा पेठ) असे त्याचे नाव आहे. मंगळवार तळ्याजवळ रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी रिक्षाचालक असलेल्या प्रसाद प्रकाश कुलकर्णी (वय 30, रा. मंगळवार पेठ) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत संदीप याचे वडील रमेश यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 2012 मध्ये संदीपने कुलकर्णी याच्याविरूद्ध दरोड्याची फिर्याद दाखल केली होती. त्याचा खटला न्यायालयात सुरू झाला आहे. तो मागे घेण्यासाठी कुलकर्णी संदीपला वारंवार धमक्‍या देत होता. न्यायालयातही त्याने त्याला दमदाटी केली होती. काल रात्री संदीप उशिरापर्यंत घरी आला नाही. त्यामुळे त्याला शोधण्यासाठी मी राजवाडा परिसरात गेलो होतो. तो दिसला नाही. त्यामुळे घरी परत येत होतो. त्या वेळी मंगळवार तळ्याजवळ कुलकर्णी संदीपला लोखंडी हत्याराने मारहाण करत होता. केस मागे घेतली नाही तर तुला सोडणार नाही, असे म्हणत त्याने त्याला गंभीर मारहाण केली, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पत्नीने व मी संदीपला जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: youth murder in Satara