कऱ्हाड : ग्रामपंचायतीच्या निवडणूक वादातून युवकाचा खून

सचिन शिंदे
बुधवार, 4 एप्रिल 2018

चार महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर वारंवार खुन्नस दिल्याच्या कारणावरून त्याला भोसकण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी कऱ्हाड तालुका पोलिसांनी गणेश आनंदराव देशमुख (रा. कुसूर) याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

कऱ्हाड : ग्रामपंचायतीच्या निवडणुक वादातून कुसूर (ता. कऱ्हाड) येथे युवकाचा खून झाला. उमेश उद्धव मोरे (वय २०) असे खून झालेल्याचे नाव आहे. काल (मंगळवारी) सायंकाळी त्याच्यावर चाकू हल्ला झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू असताना काल रात्री निधन झाले. 

चार महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर वारंवार खुन्नस दिल्याच्या कारणावरून त्याला भोसकण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी कऱ्हाड तालुका पोलिसांनी गणेश आनंदराव देशमुख (रा. कुसूर) याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसूर येथील ग्रामपंचायतीची निवडणूक चार महिन्यांपूर्वी झाली आहे.

निवडणूक निकालानंतर गावातील उमेश मोरे व गणेश देशमुख दोघांत वाद झाला होता. त्यानंतर वेळोवेळी दोघांत शाब्दिक चकमक उडत होती. काही दिवसांपूर्वी गावच्या यात्रेतही दोघांमध्ये वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून मंगळवारी सायंकाळी गणेश देशमुख व उमेशचा भाऊ सुशांत यांच्यात वाद झाला. त्यावेळी तेथे गेलेल्या उमेशवर त्या गणेशने वार केला. उमेशच्या छातीत व पोटात भोसकले. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. नातेवाईक व परिसरातील ग्रामस्थांनी त्याला उपचारार्थ कऱ्हाडच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक भापकर तपास करीत आहेत.

Web Title: Youth murder through a gram panchayat election dispute in Karhad