सांगलीत मायलेकरावर हल्ल्यात मुलगा ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

सांगली - शहरातील आपटा पोलिस चौकीसमोरच्या एका अपार्टमेंटमध्ये आज एका फ्लॅटमध्ये मायलेकरावर खुनी हल्ला करण्यात आला. यामध्ये हितेश ऊर्फ टिल्लूभाई जयंतीलाल पारेख (वय 45) हा ठार झाला. तर त्याची आई कमल
जयंतीलाल पारेख (वय 83) या गंभीर जखमी झाल्या.

सांगली - शहरातील आपटा पोलिस चौकीसमोरच्या एका अपार्टमेंटमध्ये आज एका फ्लॅटमध्ये मायलेकरावर खुनी हल्ला करण्यात आला. यामध्ये हितेश ऊर्फ टिल्लूभाई जयंतीलाल पारेख (वय 45) हा ठार झाला. तर त्याची आई कमल
जयंतीलाल पारेख (वय 83) या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पहाटेच्या सुमारास हा हल्ला झाल्याची शक्‍यता आहे. सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ
उडाली. याबाबत अधिक माहिती अशी, आपटा पोलिस चौकीसमोर श्री अपार्टमेंट आहे. यामध्ये बी विंगमधील पाच नंबरच्या फ्लॅटमध्ये पारेख कुटुंबिय रहात होते. या ठिकाणी हितेश, त्यांची आई कमल आणि त्यांचा पुतण्या सूरज अतुल पारेख (वय 22) असे तिघे राहतात. इतर कुटुंबिय शहरात दुसऱ्या ठिकाणी रहाते. काल रात्री सूरज हा फ्लॅटमध्ये झोपण्यास नव्हता.

आज सकाळी कमल यांचा दुसरा मुलगा महेश पारेख हे आईला भेटण्यासाठी श्री अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये आले. फ्लॅटचा दरवाजा उघडाचा होता. त्यांनी आत जाऊन पाहिले असता बाहेरच्या खोलीतच त्यांना हितेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. तर आईही गंभीर अवस्थेत जखमी होवून पडल्याचे दिसले. हा प्रकार पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी तातडीने बाकीच्या कुटुंबियांना बोलवून आईला उपचारासाठी पाठवले
आणि पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली.

आपटा पोलिस चौकीजवळ खून झाल्याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप पोमण पथकासह घटनास्थळी पोचले. पाठोपाठ शहर उपअधीक्षक अशोक वीरकर हेही घटनास्थळी आले. त्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनीही घटनास्थळी येवून पाहणी केली. त्यांनी
पंचनाम्याबाबत सूचना कल्या. त्यानंतर श्‍वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. हल्ला झालेल्या हॉलमध्ये रक्ताचे थारोळे पडले होते. तेथे एक हातोडा सापडला आहे. तसेच हितेश यांनी पाळलेले पामेरियन कुत्रेही होते. श्‍वान पथकाने अपार्टमेंटच्या मागे माधवनगर रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर
चढ्‌ढा फिटनेस सेंटरपर्यंत माग काढला. ते तेथेच घुटमळले. तर ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी महत्वाचे ठसे मिळाले आहेत.

हितेश पारेख हे अंबिका सेल्स एजन्सीमध्ये सेल्समन होते. कमल पारेख यांना तीन मुले होती. त्यातील अतुल नावाचा मुलगा मयत झाला आहे. त्याचा मुलगा सूरज हा त्यांच्याजवळ रहात असे.

Web Title: Youth murdered in Sangli