नियम मोडल्याने अपघात; शिक्षा दिवसभर सिग्नलवर थांबण्याची

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

कोल्हापूर - शाहू स्मारक भवन चौकातील सिग्नलजवळ सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत थांबून वाहतूक नियंत्रण कसे केले जाते, याची पाहणी करावी, अशी समज न्यायाधीशांनी तरुणाला दिली. अल्पवयीन असताना त्याने दुचाकीवरून डब्बलसीट जाऊन अपघात केला होता. त्याबाबत ही समज देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले, की किसरूळ (ता. पन्हाळा) येथील जगन्नाथ विष्णू मुंगडे (सध्या वय २१) हा सतरा वर्षांचा असताना दुचाकीवरून नातेवाइकाला घेऊन बाजारभोगावकडे जात होता. तेव्हा ट्रॅक्‍टर आणि जीपला त्याची धडक बसली होती. यामध्ये त्याचा दुचाकीवर असलेला नातेवाईक जखमी झाला होता. याची नोंद कळे पोलिस ठाण्यात झाली होती. तेव्हा मुंगडे हा अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी याबाबतची नोंद बाल न्याय मंडळाकडे वर्ग केली. अपघाताची माहिती घेऊन प्रमुख न्यायाधीश, बाल न्याय मंडळ यु. टी. मुसळे यांनी तीन डिसेंबर २०१६ ला त्याला समज दिली. न्यायाधीश मुसळे यांनी दिलेल्या समजेत जगन्नाथ विष्णू मुंगडे याने सोमवारी (ता. ५) सकाळी अकरा ते दुपारी ४ वाजेपर्यंत शाहू स्मारक चौकजवळील सिग्नलला वाहतूक नियंत्रण कसे केले जाते, याची पाहणी करावी असे म्हटले होते. त्यानुसार तो आज तेथे उभा होता. याबाबतचा अहवाल ७ डिसेंबरपर्यंत बाल न्यायालयाला सादर करावा, असेही आदेश दिले आहेत. त्यानुसार अहवाल देण्यात येणार आहे. मुसळे हा विवाहित असल्याचे त्याने पोलिसांना सांगितल्यावर पोलिसही आवाक्‌ झाले. त्याचे लव्ह मॅरेज असून त्याला कुटुंबीयांनी संमती दिल्यामुळे लग्न समारंभ थाटात झाल्याचेही तो सांगत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: youth punishment by traffic police