शेतकऱ्यांनो, तुम्ही कुणालाही मत द्या पण... : आदित्य ठाकरे

Youth shivsena chief Aditya Thakarey interacted with farmers in drought hit areas
Youth shivsena chief Aditya Thakarey interacted with farmers in drought hit areas

मोहोळ - 'मी गावोगावी जातोय, पण परिस्थिती भीषण आहे. पाणी, चारा, पशुखाद्य टंचाई तीव्र जाणवत आहे. शेतकऱ्यांनी जगावं कसे? राजकारण करण्यापेक्षा मदत महत्त्वाची आहे. तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा कुणालाही मते द्या, मात्र मदतीची गरज भासली तर शिवसेनेची आठवण करा. अडचणीमुळे कोणीही आत्महत्या करू नये. मी पाहणी दौऱ्यासाठी आलो नसून मदतीसाठी आलो आहे,' असे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सारोळे ता. मोहोळ येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी जिल्हा प्रमुख गणेश वानकर होते. यावेळी ठाकरे यांच्या हस्ते पशुखाद्य व पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने याप्रसंगी युवा शिवसैनिक उपस्थित होते. 

ठाकरे पुढे म्हणाले, 'दुष्काळाची दाहकता मोठी आहे. जगाच्या पोशिंद्याला सर्वांनी मदत करावयाची आहे. आपण आजच्या पाहणीचा सर्व अहवाल सेना प्रमुखांना सादर करून त्या बाबतच्या उपाय योजना बाबत बैठकीचे आयोजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला व परिस्थिती जाणून घेतली. त्यांनी पोखरापुर येथील तळयाची पाहणी केली. ठाकरे यांच्या हस्ते 14 पाण्याच्या टाक्यांचे व पशुखाद्याचे वाटप केले.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com