पोलिस उपाधिक्षक विजय चौधरी यांना युवा क्रीडा पुरस्कार

पोलिस उपाधिक्षक विजय चौधरी यांना युवा क्रीडा पुरस्कार

कराड : तीन वेळा महाराष्ट्र केसरी असलेल्या पोलिस उपाधिक्षक विजय चौधरी यांना यंदाचा युवा क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहे. माजी उपाध्यक्ष नगरसेवक राजेंद्र यादव यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (ता. 19) त्याचे वितरण होणार आहे. वाढदिवसानिमित्त बुधवारी विविध कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती बांधकाम सभापती हणमंत पवार, उपाध्यक्ष जयवंत पाटील यांनी दिली. यावेळी नगरसेवक अतुल शिंदे, सुधीर एकांडे, प्रितम यादव उपस्थित होते. 

पवार म्हणाले, यंदा यशवंत मॅरेथॉन स्पर्धा, रोजगार मेळावा, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, गुणवंताचा सत्कार आहे. त्यासिवाय युवा मेळावाही होणार आहे. युवा मेळाव्यास महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार उदयनराजे भोसले, माजी मंत्री विनय कोरे, बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे उपस्थित राहणार आहेत. 

बुधवार सकाळी सात वाजता दत्त चौक येथून यशवंत मॅरॅथॉन स्पर्धेस प्रारंभ होईल. नऊ वाजता ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतील. केंद्र शाळा तीनमध्ये (कै.) जयसिंग करपे यांच्या स्मरणार्थ आरोग्य शिबिर आहे. (कै.) समीर पवार यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर होणार आहे. राज्यातील 25 हून अधिक कंपन्यांचा सहभाग असलेला रोजगार मेळावा होईल. गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षकांचा सन्मान यावेळी आहे. यावेळी तहसीलदार राजेंद्र चव्हाण, डॉ. सुभाष एरम, बाळासाहेब कुलकर्णी यांची उपस्थिती राहणार आहे. दुपारी चार ते सहा महिला मेळावा व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी साडेसहाच्या वजता युवा मेळावा आहे. त्याला महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार उदयनराजे भोसले, माजी मंत्री विनय कोरे, बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, नगराध्यक्ष रोहिणी शिंदे उपस्थित राहणार आहेत. यावेळी शहीद जवान रविंद्र धनावडे यांच्या मातोश्री यांचा वीरमाता पुरस्कार व रोख रक्कम देऊन सन्मान होणार आहे. 

यांचाही होणार सन्मान 
विठ्ठल रूक्मीणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, कृष्णा खोरे विकास महामंडळ उपाध्यक्ष खासदार संजय पाटील, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष संजय पवार यांचा नागरी त्या त्या पदावर निवडीबद्दल त्यांचाही सत्कार होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com