मोबाईल तपासल्याच्या रागातून युवकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - घरातल्यांनी मोबाईल तपासल्याच्या रागातून २२ वर्षीय युवकाने आज विष प्राशन करून आत्महत्या केली. तुषार बाळासाहेब अवघडे (रा. गडमुडशिंगी) असे त्याचे नाव आहे.

कोल्हापूर - घरातल्यांनी मोबाईल तपासल्याच्या रागातून २२ वर्षीय युवकाने आज विष प्राशन करून आत्महत्या केली. तुषार बाळासाहेब अवघडे (रा. गडमुडशिंगी) असे त्याचे नाव आहे.

गांधीनगर पोलिसांनी सांगितले, की पेंटर अवघडे तीन मुलांसह राहात आहेत. त्यांचा मोठा मुलगा तुषार मिळेल ते काम करीत होता. त्याचा मोबाईल वडील आणि बहिणीने तपासला होता. मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्या होत्या. यावरून वडिलांनी तुषारला जाब विचारून मारहाण केली होती. हा राग डोक्‍यात ठेवून तुषार दुपारी घरातून बाहेर पडला. गावातील माळावर जाऊन त्याने विष घेतले. काही वेळानंतर तो घरी परत आला; तेव्हा त्याला उलट्या सुरू झाल्या. चक्कर येऊ लागली. त्यामुळे त्याने बहीण आणि वडिलांना विष घेतल्याचे सांगितले. त्याला सीपीआरमध्ये दाखल केले.

Web Title: Youth suicide due to mobile investigations