सांगली : रायगाव येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

कडेगाव -  रायगाव (ता. कडेगाव) येथील अमोल सुरेश पवार (वय 27) या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी दहा वाजता रायगाव येथे घडली. 

कडेगाव -  रायगाव (ता. कडेगाव) येथील अमोल सुरेश पवार (वय 27) या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी दहा वाजता रायगाव येथे घडली. 

याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रायगाव येथील अमोल पवार या तरुणाने आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घरात कोणी नसल्याचे पाहून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर घरात आलेल्या नातेवाईकांच्या हा प्रकार निदर्शनास आला. याबाबत पोलिसपाटील पोपट विष्णू कळके यांनी कडेगाव पोलिसांत फिर्याद दिली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. अधिक तपास पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस हे करीत आहेत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth suicide incidence in Raigaon

टॅग्स