मोबाईल कंपनीच्या व्यवस्थापकाची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

अनकेश हा मूळचा बिहारचा आहे. त्याचे कुटुंब सध्या बंगळुरुमध्ये आहे. तो गेल्या दोन महिन्यांपासून मंगल रेसिडेन्सीमध्ये खोली करून एकटाच राहत होता. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिसांत झाली असून त्याचे वडील दुर्गेश मिश्रा हे मंगळवारी सोलापुरात येणार आहेत.

सोलापूर : आसरा चौकातील मंगल रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या अनकेश दुर्गेश मिश्रा (वय 28) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अनकेश हा एका मोबाईल हॅण्डसेट कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून नोकरीला होता. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, असे पोलिसांनी सांगितले. 

ही घटना सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. अनकेश याने राहत्या घरी बेडरूममधील छताच्या फॅनला नायलॉन दोरीच्या सहायाने गळफास घेतला. त्याला खाली उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले.

अनकेश हा मूळचा बिहारचा आहे. त्याचे कुटुंब सध्या बंगळुरुमध्ये आहे. तो गेल्या दोन महिन्यांपासून मंगल रेसिडेन्सीमध्ये खोली करून एकटाच राहत होता. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिसांत झाली असून त्याचे वडील दुर्गेश मिश्रा हे मंगळवारी सोलापुरात येणार आहेत. त्यानंतर शवविच्छेदन होईल. वडिलांशी संवाद साधल्यानंतरच आत्महत्येचे कारण समोर येण्याची शक्‍यता आहे.

Web Title: youth suicide in Solapur