तरुणांनो...बदल घडविण्यासाठी एकत्र या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जानेवारी 2017

सेनापती कापशी - ‘बदल घडविण्यासाठी आता तरुणांनी एकत्र येण्याची गरज आहे,’ असे आवाहन माजी उपसभापती उदयसिंह घोरपडे यांनी केले. परशराम तावरे यांच्या फंडातून वायफाय सुविधेचे उद्‌घाटन करताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्‌घाटन सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे संचालक वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते झाले.

श्री. घोरपडे म्हणाले, ‘‘राजकारणात केलेले काम सगळेच खरे असते असे नाही; परंतु पातळी सोडून राजकारण करू नये. आता कापशीत बदलाची गरज आहे. त्यासाठी गटतट बाजूला ठेवून तरुणांच्या पाठीशी राहणार आहे.’’

वीरेंद्र मंडलिक म्हणाले, ‘‘वायफाय सुविधा चांगली आहे; परंतु तरुणांनी त्याचा जास्तीतजास्त उपयोग अभ्यासासाठी करावा. जिल्हा परिषद फंडातून केलेल्या तावरे यांच्या कामाची पत्रके काढून घरोघरी वाटा. कापशीला मोफत वायफाय देऊन त्यांनी चांगला उपक्रम राबविला आहे.’’ परशराम तावरे म्हणाले, ‘‘वायफायची कल्पना पत्नी अश्‍विनी तावरे यांनी सुचविली. त्याला सौरभ नाईक यांची तांत्रिक मदत मिळाली. श्रीनिवास देशपांडे, धनाजी काटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदीप चव्हाण, लगमा कांबळे, दिलीप पाटील, राजाभाऊ माळी, अतुल दिवटणकर, तुकाराम भारमल, प्रशांत गायकवाड, आदी उपस्थित होते.

Web Title: Youths... please make change