कठुआ प्रकरणी युवक क्रांती दलातर्फे कँडल मार्च

दत्ता उकिरडे
मंगळवार, 17 एप्रिल 2018

राशीन (नगर) : कठुआ (जम्मू) येथे आठ वर्षांच्या निरागस मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ युवक क्रांती दलातर्फे राशीनमध्ये सोमवारी रात्री कँडल मार्च काढण्यात आला होता.

राशीन (नगर) : कठुआ (जम्मू) येथे आठ वर्षांच्या निरागस मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ युवक क्रांती दलातर्फे राशीनमध्ये सोमवारी रात्री कँडल मार्च काढण्यात आला होता.

शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या कँडल मार्चला सुरवात करण्यात आली. यामध्ये युवक क्रांती दलाचे शहराध्यक्ष किरण पोटफोडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अशोक टाक, रिपब्लिकन पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष भीमराव साळवे, भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष साहिल काझी, संभाजी ब्रिगेडचे गणेश कदम, अॅड. लक्ष्मण राजेभोसले,  शरीफ काझी, सागर जाधव, बाझिल काझी, गजानन माकोडे, सोयब काझी, विनोद सोनवणे यांच्यासह मुस्लिम समाजातील तरुण आणि लहान मुले मोठ्या संख्येने  सहभागी झाले होते. 

या कँडल मार्चमध्ये केंद्र सरकारच्या निषेधाचे फलक आणि राष्ट्र ध्वज हातात घेऊन आसिफा वरील अत्याचाराचा निषेध नोंदविण्यात आला. मुख्य बाजारपेठेतून हा मार्च पोलीस दुरक्षेत्रा समोरील सार्वजनिक ध्वजारोहणाच्या ठिकाणी नेण्यात आला. यावेळी अत्याचारात बळी गेलेल्या आशिफास किशोर जाधव यांनी आपल्या भाषणातून सर्वांच्या वतीने श्रद्धांजली वाहून, घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करीत निषेध व्यक्त करण्यात आला. 

Web Title: yuva kranti dal candle march on kathua rape case in rashin nagar