शिवसेनेच्या बुधवारी मुलाखती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडे जिल्ह्यातून सुमारे ६०० हून अधिक इच्छुकांचे अर्ज आले आहेत. इच्छुक उमेदवारांच्या येत्या बुधवारी (ता. २५) मुलाखती घेण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी मेळाव्यात जाहीर केले.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांना शिवसेनेचेच आव्हान असणार आहे. निवडणुकीसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एकेका मतदारसंघात दहापेक्षा अधिक इच्छुक आहेत.

उमेदवारांची निवड मुलाखती घेऊन केली जाणार असून, बुधवारी (ता. २५) सकाळी ९ वाजल्यापासून कळंबा येथील अमृतसिद्धी मंगल कार्यालयात मुलाखती घेतल्या जाणार आहेत. मुलाखतीसाठी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्याबरोबरच मुंबईचे काही पदाधिकारी निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
इच्छुकांनी सर्वात प्रथम शिवसेनेचे सभासदत्व घ्यावे. अन्यथा उमेदवारीचा विचार केला जाणार नाही. याशिवाय राष्ट्रीयीकृत बॅंकेत उमेदवाराचे खाते असणे आवश्‍यक आहे. तसेच अन्य कायदेशीर बाबींची पूतर्ता करून घ्यावी. शासकीय, बॅंकेची देणी असल्यास ती भरावीत. अर्ज अपात्र ठरवा म्हणून विरोधक प्रयत्न करणार हे लक्षात घेऊन कायदेशीर बाबीसंबंधी काही मदत हवी असेल, तर कार्यालयाशी संपर्क साधावा. शिवसेना हा शिस्तीचा पक्ष आहे. त्यामुळे शक्तिप्रदर्शन केल्यावर उमेदवारी मिळेल, या भ्रमात कोणी राहू नये. मुलाखतीसाठी येताना मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणण्याची गरज नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Web Title: zilla parishad & panchyat committee election interview by shivsena