डिजिटल शाळेतील विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जुलै 2018

पापरी (ता. मोहोळ) येथील जिल्हा परिषद आदर्श डिजिटल शाळेतील चार शिक्षक व एका शिक्षिकेची बदली चालु शैक्षणिक वर्षात झाली. त्यांच्या बदल्यात नवीन शिक्षक शिक्षिका शाळेत आल्या आहेत. नवीन आलेल्यांचा स्वागत समारंभ व बदलून गेलेल्यांचा निरोप समारंभ शाळेत आयोजित केला होता.

मोहोळ : पापरी (ता. मोहोळ) येथील जिल्हा परिषद आदर्श डिजिटल शाळेतील विद्यार्थ्यांनी बदली झालेल्या शिक्षिक व शिक्षिकांना निरोप दिला तर नवीन आलेल्या शिक्षकांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना व शिक्षकांना यावेळी अश्रु आवरता आले नाहीत. शाळा व्यवस्थापन समितिने बदली झालेल्या शिक्षिक व शिक्षिकांना टॉवेल टोपी व संपुर्ण कपडयाचा आहेर देवून पापरी शाळेने अनोखा फंडा सुरू केला आहे.

पापरी (ता. मोहोळ) येथील जिल्हा परिषद आदर्श डिजिटल शाळेतील चार शिक्षक व एका शिक्षिकेची बदली चालु शैक्षणिक वर्षात झाली. त्यांच्या बदल्यात नवीन शिक्षक शिक्षिका शाळेत आल्या आहेत. नवीन आलेल्यांचा स्वागत समारंभ व बदलून गेलेल्यांचा निरोप समारंभ शाळेत आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान भोसले होते. यावेळी उपाध्यक्ष रमेश टेकळे, पिंटू गायकवाड़, पांडुरंग डोंगरे, आबासाहेब टेकळे, कोन्हेरी केंद्राचे प्रभारी केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर खूने आदी  उपस्थित होते.

बदली झालेल्या शिक्षक शिक्षिकांनी पापरी शाळेत अनेक विविध उपक्रम राबवुन विध्यार्थ्याच्या ज्ञानात भर घालण्याचे काम केले. त्यामुळे शाळा जिल्हयात आदर्श ठरली. विद्यार्थ्यांना सोडून जाताना व त्यांचा निरोप घेताना शिक्षकांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी समीर बागवान म्हणाले आंम्ही ज्या ठिकाणी  बदलुन गेलो आहोत. त्या ठिकाणी ही शिक्षणाचा पापरी पॅटर्न सुरू केला आहे. यावेळी विध्यार्थ्यानीही शिक्षकांच्या गौरवास्पद मनोगते व्यक्त केली, तर कांही पालकांनीही मनोगते व्यक्त केली, आभार आबासो टेकळे यांनी मानले.
 

Web Title: ZP digital school in Mohol