सात गटांत होणार पडद्याआडून हालचाली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

राजकीय दिग्गजांना लागली लॉटरी; मसूर, कोपर्डे, तांबवे, विंग, येळगावला दिसणार मोठी चुरस 
कऱ्हाड - तालुक्‍यातील मसूर, कोपर्डे हवेली, तांबवे, विंग आणि येळगाव या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या गटात सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांना लॉटरी लागली आहे. रेठरे बुद्रुक गट हा सर्वसाधारण प्रवार्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने तेथेही चुरस दिसेल. आजपर्यंत ज्यांनी सर्वसाधारण प्रवर्गातून सैदापूर, उंब्रज, पाल, वारुंजी, कार्वे येथे प्रतिनिधित्व केले, तेथे आता आरक्षणामुळे इच्छुकांना पडद्याआडून हालचाली कराव्या लागतील. 

मसूर गट हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, ‘महानंद’चे संचालक वसंतराव जगदाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार जगदाळे, सुदाम दीक्षित हे नशीब आजमावतील. विंग गटात सर्वसाधारण प्रवर्गातून माजी सभापती प्रदीप पाटील, कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, विंगचे माजी सरपंच बबनराव शिंदे यांना संधी आहे. कोपर्डे हवेलीत मोठी चुरस पाहायला मिळेल. आमदार बाळासाहेब पाटील समर्थक बाळासाहेब चव्हाण, नेताजी चव्हाण, उंडाळकर गटाकडून बाजार समितीचे संचालक हिंदुराव चव्हाण, आमदार पृथ्वीराज चव्हाण समर्थक निवास थोरात यांची नावे चर्चेत आहेत. उंडाळकर यांच्या बालेकिल्यातील येळगाव हा गट सर्वसाधारण झाल्याने तेथे त्यांच्या विचारांचा उमेदवार निवडणुकीत असेल. राष्ट्रवादी काँग्रेमसध्ये प्रवेश केलेले राजाभाऊ पाटील-उंडाळकर हे पक्षाचे गड लढवण्यासाठी सज्ज असतील. बळिराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील यांनीही तयारी सुरू केली आहे. तांबवे गटात तिरंगी किंवा चौरंगी लढत होईल. पाल गटावर सभापती देवराज पाटील यांचे प्राबल्य आहे. मात्र, तेथे राजकीय इच्छुकांची संख्या वाढल्याने दुरंगी लढत होईल. काले गटातील सत्ता आपल्याकडे यावी यासाठी उंडाळकर, ज्येष्ठ नेते भीमरावदादा पाटील, भोसले यांच्या गटाविरोधात पृथ्वीराज चव्हाण, अविनाश मोहिते हे आव्हान उभे करतील. 
वारुंजीत सर्वच नेत्यांचे सर्वच गट सक्रिय झालेत. मात्र, संबंधित गटाकडून उमेदवारी कोणाला मिळणार, यावर विजयाची नांदी ठरेल. कार्वे गटाचे नाव कार्वे असले तरी तेथे सातत्याने वडगाव हवेलीचा दबदबा राहिला आहे. त्यामुळे तेथे कोणाची उमेदवारी असणार, याकडे लक्ष असेल. राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि जागृत असणारा सैदापूर गटात उपसभापती विठ्ठलराव जाधव यांचे वर्चस्व राहिले. मात्र, हा गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने अनेकांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. तेथे तिरंगी लढत दिसेल, असे चित्र आहे. उंब्रज गटामध्ये अनुसूचित जातीतील महिला उमेदवारांना संधी मिळू शकेल. 

रेठरे बुद्रुक गटाकडे राहणार सर्वांचे लक्ष
रेठरे बुद्रुक गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने तेथे ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते, ‘कृष्णा’चे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले, ‘कृष्णा’चे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे युवा नेते अविनाश मोहिते हे कोणता उमेदवार देणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Web Title: zp election reservation declare

टॅग्स