सोलापुरात "राष्ट्रवादी'वर माघारीची नामुष्की

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

सोलापूर - सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजप-महाआघाडीचे संजय शिंदे, तर उपाध्यक्षपदी कॉंग्रेस पुरस्कृत अपक्ष असलेले शिवानंद पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सर्वाधिक 23 जागा मिळविणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसवर ऐनवेळी पराभव दिसत असल्यामुळे माघार घेण्याची नामुष्की ओढवली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी एक झाली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्वाधिक जागा असतानाही त्यांच्याकडून अध्यक्षपदासाठी कोणीही इच्छुक पुढे आले नाही. शेवटी शेतकरी कामगार पक्षाच्या अनिल मोटे यांना अध्यक्षपदासाठी, तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून श्रीमंत थोरात यांनी अर्ज दाखल केले. मात्र, वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही आमचे उमेदवारी अर्ज माघारी घेत असल्याचे "राष्ट्रवादी'चे गटनेते बळिराम साठे यांनी सभागृहात सांगितल्यानंतर शिंदे व पाटील यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला. कॉंग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनीही भाजप-महाआघाडीला साथ दिली. एकूणच जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठांनीच पक्षाच्या स्थानिक नेत्यांवर नामुष्कीची वेळ आणल्याचे स्पष्ट होते.

Web Title: zp election result in solapur