...आता मैदान जिल्हा परिषदेचे

रवींद्र माने
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

६ जिल्हा परिषद, १२ पंचायत समिती जागांसाठी मोर्चेबांधणी सुरू

तासगाव - पालिका निवडणुकीची लढाई संपते न संपते तोच तालुक्‍यातील जि. प., पं. स. निवडणुकांची चाहूल लागली असून, ६ जि. प. आणि १२ पं. स. जागांसाठी राष्ट्रवादी भाजपमध्ये जोरदार मुकाबला होण्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, ही निवडणूक राष्ट्रवादी आणि भाजपच्या दृष्टीने प्रतिष्ठेची ठरणार आहे. 

६ जिल्हा परिषद, १२ पंचायत समिती जागांसाठी मोर्चेबांधणी सुरू

तासगाव - पालिका निवडणुकीची लढाई संपते न संपते तोच तालुक्‍यातील जि. प., पं. स. निवडणुकांची चाहूल लागली असून, ६ जि. प. आणि १२ पं. स. जागांसाठी राष्ट्रवादी भाजपमध्ये जोरदार मुकाबला होण्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, ही निवडणूक राष्ट्रवादी आणि भाजपच्या दृष्टीने प्रतिष्ठेची ठरणार आहे. 

गेली वीस वर्षे तालुक्‍यातील जिल्हा परिषद पंचायत समिती गटांवर राष्ट्रवादीचे पर्यायाने आर. आर. पाटील गटाचे पूर्ण वर्चस्व आहे. सध्या जि. प. च्या ६ पैकी ५, तर पंचायत समितीच्या १२ पैकी १० जागा आबा गटाच्या ताब्यात आहेत. गेल्या एकाच निवडणुकीत आबा काका गट एकत्र होता. आता येऊ घातलेल्या निवडणुकीत सारी राजकीय समीकरणे बदलली आहेत.

आर. आर. पाटील यांच्या निधनानंतरची राष्ट्रवादीसाठी ही पहिली निवडणूक आहे, तर खासदार संजयकाका पाटील या वेळी प्रथमच भाजपच्या झेंड्याखाली निवडणूक लढवत आहेत. संजयकाकांच्या माध्यमातून या वेळी प्रथमच भाजप जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये शिरकाव करणार आहे.

त्यादृष्टीनेही ही निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची ठरणार आहे. आबा गटाच्या दृष्टीने अस्तित्वाची, तर काका गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत.  तालुक्‍यात सावळज, मणेराजुरी, मांजर्डे, चिंचणी, येळावी आणि विसापूर असे सहा गट आहेत, त्यापैकी चिंचणी गटात सद्या भाजपाची सत्ता आहे, तर विसापूर गटातून निवडून गेलेल्या छायाताई खरमाटे यांनी भाजपाची पाठराखण केली आहे. मणेराजुरी गटातून मागील निवडणुकीत काका गटाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी भाजपाने जि. प. निवडणुकीसाठी दोन महिने आधीपासूनच मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे.इच्छूकांची नावे पुढे येवू लागली आहेत. तालुकयातील  शेती आणि पाण्याचा प्रश्‍न पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. अजून दोन महिन्यांचा अवधी असल्याने राजकारणाच्या पुलाखालून बरेच पाणी जाणार आहे. 

पालिकेने वाढवला आत्मविश्‍वास 
तासगाव नगरपालिकेची निवडणूक दोन्ही पक्षांसाठी संजीवनी देणारी ठरणार आहे. नगरपालिका निवडणुकीतील यशामुळे भाजपामध्ये उत्साहाचे वातावरण आहे, या विजयाचे नैतिक पाठबळ भाजपामागे असणार आहे, तर राष्ट्रवादीला आर. आर. पाटील यांच्याशिवाय शर्थीने झुंज देत पालिकेत आठ जागांवर मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. पाच वर्षांपूर्वीच्या जि. प. निवडणुकांवर त्यावेळी झालेल्या नगरपालिका निवडणुकांचा मोठा परिणाम झाला होता.

Web Title: zp election tasgav