'झेडपी' कर्मचारी संघटनेचा वेतन त्रुटीचा प्रस्ताव सादर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

सोलापूर - महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने वेतन त्रुटीच्या संदर्भातील प्रस्ताव सरकारला सादर केला आहे. संघटनेला सरकारने दिलेल्या पत्रावरून हा प्रस्ताव दिला आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी हा विषय मार्गी लावण्याची विनंती संघटनेच्या वतीने केली आहे.

ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी सं. ना. भंडारकर यांना संघटनेचे अध्यक्ष बलराज मगर यांना पत्र लिहून राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात "ग्रेड पे मध्ये सातव्या वेतन आयोगापूर्वी सुधारणा करण्यासंदर्भात' प्रस्ताव देण्याची मागणी केली होती. त्यानुसार संघटनेने 67 पानांचा तपशीलासह प्रस्ताव सरकारला दिला आहे. चौथ्या वेतन आयोगापासून सहाव्या वेतन आयोगापर्यंत कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे या प्रश्‍नावर संवेदनशीलपणे विचार करून कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: zp employee organisation payment proposal declare