कर्मचारी बदल्यांसाठी आजपासून समुपदेशन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

जिल्हास्तरावर २३५ बदल्या शक्‍य

सांगली - झेडपीच्या विविध विभागांकडील कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरावरील स्थानिक बदल्यांसाठी उद्यापासून (ता. १२) दोन दिवस समुपदेशन आयोजित केले आहे. जिल्हा स्तरावर २३५ कर्मचाऱ्यांच्या  बदल्या शक्‍य आहेत. शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश आणि पोर्टल बंद असल्याने त्यांना मुदतवाढ मिळणार आहे.

झेडपी सामान्य प्रशासन, बांधकाम, छोटे पाटबंधारे विभाग, बांधकाम, आरोग्य, ग्रामपंचायत पशुसंवर्धन, अर्थ आणि कृषी अशा विभागांमध्ये कार्यरत ३८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. यामध्ये १९८ प्रशासकीय बदल्या होणार आहेत. एकूण २३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या शक्‍य आहेत. झेडपी वर्ग तीन आणि वर्ग चार प्रवर्गातील विविध अस्थापनेकडे एकूण   ३ हजार ५१० मंजूर पदे आहेत. त्यापैकी ३ हजार अकरा कर्मचारी आहेत. 
 
शिक्षकांची बदली पोर्टलमुळे पुन्हा लांबणीवर 

शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलीमध्ये मात्र शासनाचे वेब पोर्टलच बंद-चालूचा खेळ सुरू आहे. पोर्टलमध्ये दुरुस्त्या होऊन पुन्ह:प्रक्रिया मे नंतर सुरू होणार असल्याचे सांगण्यात येते. शिक्षकांच्या बदल्यांसाठी मुदतवाढ मिळेल. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या  बदल्या मात्र नियोजित वेळेप्रमाणे होणार आहेत.

Web Title: zp employee transfer