पदाधिकारी वगळून बदल्यांना सुरवात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

कोल्हापूर - औद्योगिक न्यायालयाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बदलीच्या पत्राला स्थगिती दिल्यामुळे जिल्हा परिषदेतील संघटनांचे पदाधिकारी वगळून आजपासून बदल्यांना सुरवात झाली. वसंतराव नाईक समिती सभागृहात बदल्यांची प्रक्रिया पार पडली. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक, उपाध्यक्ष हंबीरराव पाटील उपस्थित होते. आज पहिल्या दिवशी १२० कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या.

कोल्हापूर - औद्योगिक न्यायालयाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बदलीच्या पत्राला स्थगिती दिल्यामुळे जिल्हा परिषदेतील संघटनांचे पदाधिकारी वगळून आजपासून बदल्यांना सुरवात झाली. वसंतराव नाईक समिती सभागृहात बदल्यांची प्रक्रिया पार पडली. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक, उपाध्यक्ष हंबीरराव पाटील उपस्थित होते. आज पहिल्या दिवशी १२० कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या.

जिल्हा परिषदेमध्ये महिनाभरापासून बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक विभागाकडून माहिती मागविणे, पात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू होते. बदलीमध्ये अपंग, सेवानिवृत्तीचा कालावधी जवळ आलेल्यांना सवलती आहेत, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेतील कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनाही सूट आहे.

बदल्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच शासनाने पाठविलेल्या मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनांच्या यादीत जिल्हा परिषदेतील एकही कर्मचारी संघटनेचा समावेश नसल्याने संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना बदलीच्या सवलतीतून वगळले. तसे पत्र डॉ. खेमणार यांनी कर्मचारी संघटना दिले. या पत्राला जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने न्यायालयात धाव घेतली. औद्योगिक न्यायालयाने डॉ. खेमणार यांच्या पत्राला स्थगिती दिल्याने संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना वगळून आज बदलीची प्रक्रिया ठरल्याप्रमाणे राबविली.

वसंतराव नाईक सभागृहात सकाळी बदलीच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिारी एम. एस. घुले उपस्थित होते. प्रशासकीय बदलीस पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच विनंती बदलीसाठी अर्ज केलेल्या कर्मचाऱ्यांना सभागृहात बोलावून घेण्यात येत होते. त्यांना रिक्‍त जागा दाखविण्यात येत होत्या. त्यामध्ये जी सोईची जागा असेल त्या ठिकाणाला कर्मचारी पसंती देत होते. अशा पद्धतीने बदल्यांची ही प्रक्रिया पार पडली. उद्या आरोग्य, पशुसंवर्धन, शिक्षण आणि महिला व बाल कल्याण विभागीातल कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.

१२० जणांच्या बदल्या
- प्रशासकीय बदल्या २१ 
- विनंती ८७ विनंती व १२ आपशी 
- सामान्य प्रशासनमधील सर्वाधिक ५५ 
- ग्रामपंचायत विभागातील ५३ 

ठिकाणांचा घोळ 
भुदरगड तालुक्‍यातील एका कर्मचाऱ्याला पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बदली हवी होती, मात्र मुलाखतीच्या वेळी हे ठिकाण दाखविले नाही. संबंधित कर्मचाऱ्यांने ती जागा रिक्‍त असल्याची माहिती घेतली होती; पण अधिकाऱ्यांनी तेथे पद रिक्‍त नसल्याचे सांगितल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांने भुदरगडला जाणे मान्य केले; मात्र नंतर लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पद रिक्‍त असल्याचे दाखवून दिल्यानंतर त्याची केलेली बदली रद्द करून पुन्हा पिंपळगावला बदली केली.

Web Title: zp employee transfer start