एका दिवशी हजार घरकुलांचे भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

रमाई आवास योजना; नव्याने दोन हजार 655 घरकुलांची मागणी
सातारा - सर्वांसाठी घरकुल मोहिमेत सातारा जिल्हा परिषदेने उज्ज्वल कामगिरी केली आहे. रमाई आवास योजनेत २०१७-१८ मध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला तीन हजार घरकुलांचे उद्दिष्ट मार्चमध्ये मिळाले होते. त्यापैकी बहुतांश घरांचे काम सुरू होते. मात्र, काही कारणांनी एक हजार घरकुलांचे काम सुरू नव्हते. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे आणि यंत्रणेने विशेष मोहीम राबवत सात मे २०१८ रोजी एक हजार घरकुलांचे एकाच दिवशी भूमिपूजन केले. 

ग्रामीण भागातील बेघरांना सर्वांना घरकुले देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे पंतप्रधान, रमाई, शबरी, पारधी घरकुल योजना राबविल्या जात आहेत.

पूर्वाश्रमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख हे पंतप्रधान आवास योजनेतून घरकुले मंजूर तसेच पूर्ण करण्यात अग्रेसर होते. त्यानंतर डॉ. शिंदे यांनीही बेघरांना घरकुले देण्यास अग्रक्रम दिला आहे. रमाई घरकुल योजनेतून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांना शंभर टक्‍के घरकुले देण्याचे त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. २०१७-१८ मध्ये जानेवारीअखेरीस तीन हजार घरकुलांचे उद्दिष्ट दिले होते. त्याला मंजुरी मिळून कामेही सुरू झाली होती. मात्र, काही घरकुले सुरू झाली नसल्याने डॉ. शिंदे, प्रकल्प संचालक नितीन थाडे यांनी सात मे रोजी एकाच दिवशी एक हजार घरकुलांचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने जिल्ह्यात एक हजार घरांचे भूमिपूजनही करण्यात आले. २०१८-१९ साठी नव्याने दोन हजार ६५५ घरकुलांची मागणी केली आहे.

Web Title: ZP Gharkul Scheme