जिल्ह्यात मुख्याध्यापक बिंदूनामावली त्रुटींच्या गर्तेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

सातारा - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापक पदासाठीच्या बिंदूनामावली (रोस्टर) पुन्हा एकदा त्रुटींच्या गर्तेत अडकली आहे. तब्बल २१ ते २२ वर्षे ही बिंदूनामावली बनविली गेली नसल्याने सध्या त्याची पूर्तता करताना शिक्षण विभागाला डोक्‍याला हात लावण्याची वेळ येत आहे. बिंदूनामावली पूर्ण नसल्याने मुख्याध्यापक पदासाठी बढत्याही थांबल्या आहेत.

सातारा - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापक पदासाठीच्या बिंदूनामावली (रोस्टर) पुन्हा एकदा त्रुटींच्या गर्तेत अडकली आहे. तब्बल २१ ते २२ वर्षे ही बिंदूनामावली बनविली गेली नसल्याने सध्या त्याची पूर्तता करताना शिक्षण विभागाला डोक्‍याला हात लावण्याची वेळ येत आहे. बिंदूनामावली पूर्ण नसल्याने मुख्याध्यापक पदासाठी बढत्याही थांबल्या आहेत.

शासकीय कर्मचारी भरतीमध्ये बिंदूनामावली, आराखड्यानुसार भरती केली जात असते. मात्र, याच बिंदूनामावलीची सातत्याने पूर्तता करण्याकडे संबंधित विभागांचे सातत्याने दुर्लक्ष होत असते. प्राथमिक शिक्षण विभागातही तीच तऱ्हा झाली आहे. प्राथमिक शिक्षकांचीही अनेक वर्षे रखडलेली बिंदूनामावली दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाली. त्यानंतर राज्यस्तरावरून आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. ही बिंदूनामावली बनविली गेल्याने शिक्षकांचा प्रश्‍न तूर्तास मिटला आहे. मात्र, मुख्याध्यापकपदासाठीची बिंदूनामावली पूर्ण झाली नसल्याने तेथील बढत्याची प्रक्रिया रखडली गेली आहे. १९९५-९६ मध्ये ही बिंदूनामावली प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. त्यानंतर या प्रक्रियेकडे दुर्लक्ष झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी प्राथमिक शिक्षण विभागाकडे ५०० हून अधिक मुख्याध्यापक पदे मंजूर होती. मात्र, त्यामध्ये न्यायालय व शासनाच्या निर्णयानुसार २०१४ मध्ये ३२८ मुख्याध्यापकांना पदावन्नत करण्यात आले होते. बिंदूनामावलीची प्रक्रिया लांबली जात असल्याने बढत्याची प्रक्रिया रेंगाळली जात असल्याने पात्र शिक्षकांतून नाराजी व्यक्‍त होत आहे.

फेरबदल होणार?
बिंदूनामावली पूर्ण करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने मागसवर्गीय कक्षाकडे माहिती सादर केली होती. मात्र, त्यामध्ये २०१४ पूर्वीची मंजूर पदे, कार्यरत मुख्याध्यापक, पदावन्नत केलेले मुख्याध्यापक यांची माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा ती माहिती जमा करण्याचे काम शिक्षण विभागाने सुरू केले आहे. त्यातच मराठा आरक्षण घोषित केले असल्याने या प्रक्रियेत बदल होण्याची शक्‍यता आहे. परिणामी, ही प्रक्रिया लांबली जाऊ शकते. 

जिल्हा परिषदेतून
२७०३ - प्राथमिक शाळा
२५२ - मंजूर मुख्याध्यापक
१२० - कार्यरत मुख्याध्यापक

Web Title: Zp headmaster Issue Roster