झेडपी बनली ८०० रुग्णांसाठी देवदूत!

विशाल पाटील
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

सातारा - दुर्धर आजारांनी ग्रासले तर चिंता लागते ती पैशांची... तो जवळ नसला तर ‘विषय’ संपला... मग, वाट पाहिली जाते, ती मृत्यूला कवटाळण्याची... अशाच काही स्थितीतून स्वत:ला सावरत असलेल्या ८०८ रुग्णांना मदतीचे ‘दिल’ पुढे केले होते, ते जिल्हा परिषदेने. महाआरोग्य शिबिरातून विविध संस्था, योजनांची मदत घेत या रुग्णांवर तब्बल ६० लाखांवरून अधिक खर्चांचे शस्त्रक्रिया, उपचार झाले. 

आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होत असून, दुसरीकडे उपचारही महागडे बनले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील, तसेच गोरगरीब रुग्णांना उपचार करून घेणेही मुश्‍कील होते. अशा परिस्थिती शस्त्रक्रिया करण्यापेक्षा मरण आलेलेच बरे, अशी रुग्ण व कुटुंबीयांची मनःस्थिती होते. अशा रुग्णांसाठी जिल्हा परिषदेने मार्चमध्ये महाआरोग्य मेळावा घेतला होता. यात तब्बल १६ हजार ६४६ रुग्णांची तपासणी केली होती. त्यातील ८०८ रुग्णांवर शस्त्रक्रियेची आवश्‍यकता असल्याने त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे सर्वसामान्य रुग्णांना ४० लाखांची, तसेच ४३७ लोकांवर औषधोपचार केल्याने त्यापोटी २० लाख रुपयांची मदत झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.

कृष्णा मेडिकल कॉलेज कऱ्हाड, जे. जे. हॉस्पिटल मुंबई, बी. जे. मेडिकल कॉलेज पुणे, सह्याद्री हॉस्पिटल पुणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, संजीवन हॉस्पिटल सातारा, सातारा हॉस्पिटल सातारा, ॲन्को लाइफ केअर हॉस्पिटल सातारा, सह्याद्री हॉस्पिटल कऱ्हाड या रुग्णालयांमार्फत या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. महात्मा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री साहाय्यता निधी व चॅरिटेबल ट्रस्टचा यासाठी निधी मदतीस आला.

इतक्‍या झाल्या शस्त्रक्रिया
आजारनिहाय केलेल्या शस्त्रक्रिया व कंसात सुरू असलेली उपचारार्थींची संख्या : बालरोग १२ (३), स्त्रीरोग १९ (३५), मेडिसीन ० (२८), हृदयरोग २ (१०), क्षयरोग/ दमा ० (१), जनरल सर्जरी २७ (२६), मूत्ररोग ३ (४), मानसोपचार ० (१), नेत्ररोग ३५ (१२), दंतरोग ० (१), कर्करोग ० (३), कान/नाक/घसा २० (२८), त्वचा ० (२९), आयुष ० (२), आयुर्वेद ० (२), अस्थिरोग ४२ (१८).

Web Title: ZP Patient Surgery Initiative