पाचवी आणि आठवीचे प्रवेश वेळापत्रक जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

सातारा - जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने इयत्ता पाचवी व आठवीच्या प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. येत्या सात मे पासून 19 पर्यंत प्रवेश अर्जांची विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया होईल. प्रवेशासाठीची पहिली सोडत 31 मे रोजी काढली जाणार आहे. दरम्यान, येत्या 15 जून रोजी शाळा सुरू होऊन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास कुलाळ यांनी दिली. 

...असे आहे वेळापत्रक 
-सात ते 19 मे प्रवेश अर्ज विक्री व स्वीकारणे 
-20 ते 24 मे अखेर प्रवेश अर्जाची छाननी करणे 
-25 मे अर्जाची यादी शाळेच्या सूचना फलकावर लावणे 
-26 ते 29 मे यादीवर आक्षेप नोंदविणे 
-31 मे पहिली सोडत 
-एक ते पाच जून पात्र विद्यार्थ्यांची यादी फलकावर प्रसिध्द करून प्रत्यक्ष प्रवेश देणे 
-11 जून प्रवेश शिल्लक असल्यास दुसरी सोडत काढणे व प्रत्यक्ष प्रवेश देणे 
-15 जून रोजी प्रत्यक्ष वर्ग सुरू करणे. 

Web Title: ZP school announced the schedule for admission for Class IX and VIII

टॅग्स