"झेडपी'च्या शाळेत शिकलेली मोठी माणसं...! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

"किफ' आता हाउसफुल्ल गर्दीत रंगला आहे. महोत्सवाला तरुणाईचा तर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तिन्ही स्क्रीनवरील चित्रपट पाहण्यासाठी परफेक्‍ट टाइमटेबल तयार झाले आहे. जागतिक सिनेमा असो किंवा मराठी मातीतला. प्रेम, साहस, करुणा, क्रौर्य आणि विनोदाचीही झालर या चित्रपटांना आहे... जणू हा "संवेदनांचा कॅलिडोस्कोप' अनुभवण्यासाठीच हा सारा माहौल एकवटला आहे. चित्रपटांबरोबरच लघुपट आणि माहितीपटांचा खजिनाही या निमित्ताने खुला झाला आहे.

"किफ' आता हाउसफुल्ल गर्दीत रंगला आहे. महोत्सवाला तरुणाईचा तर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तिन्ही स्क्रीनवरील चित्रपट पाहण्यासाठी परफेक्‍ट टाइमटेबल तयार झाले आहे. जागतिक सिनेमा असो किंवा मराठी मातीतला. प्रेम, साहस, करुणा, क्रौर्य आणि विनोदाचीही झालर या चित्रपटांना आहे... जणू हा "संवेदनांचा कॅलिडोस्कोप' अनुभवण्यासाठीच हा सारा माहौल एकवटला आहे. चित्रपटांबरोबरच लघुपट आणि माहितीपटांचा खजिनाही या निमित्ताने खुला झाला आहे. उद्या (बुधवारी) महोत्सवात कोल्हापूरच्या मातीत घडलेल्या आणि पुढे भारताचे राजदूत म्हणून यशस्वी कारकीर्द गाजवलेल्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांच्या आजवरच्या संघर्षगाथेवर आधारित "जिप्सी' हा माहितीपट साऱ्यांसाठीच "इन्स्पिरेशन' ठरणार आहे. युनिक ऍकॅडमीने या माहितीपटाची निर्मिती केली आहे. सायंकाळी सहा वाजता या माहितीपटाचा विशेष शो होणार आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्‍यातील अब्दुललाट गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले ज्ञानेश्‍वर मुळे. ते नेहमी अभिमानाने सांगतात, मी "झेडपी'च्या शाळेत शिकलो. पुढे दहावीत प्रतिष्ठेची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृती आणि शहाजी महाविद्यालयातून पदवी घेताना इंग्रजीत शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून "धनंजय कीर' पारितोषिकाचे ते मानकरी ठरले. 1981 मध्ये त्यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवल्यानंतर उपजिल्हाधिकारी म्हणून काही काळ कामही केलं. पुढे दोनच वर्षांनी भारतीय विदेश सेवेत प्रवेश केला आणि जपान, रशिया, मॉरिशस, सीरिया, न्यूयॉर्क आदी देशांत भारताचे राजदूत म्हणून काम केले. त्यांचं "माती, पंख आणि आकाश' हे पुस्तक प्रचंड लोकप्रिय झाले. स्पर्धा परीक्षाच नव्हे तर अनेक न्यूनगंड मनात बाळगून अपयशाची भीती बाळगणाऱ्या सर्वांसाठीच त्यांचा प्रवास निश्‍चितच "इन्स्पिरेशन' देणारा आहे. त्याशिवाय ""झाड कितीही मोठ्ठं झालं तरी त्याचं मातीशी, मुळाशी असणारं नातं घट्टच असायला हवं. हे नातं कमकुवत झालं की झाड कधीही कोसळू शकतं...'' हा विचारही सर्वांनाच अंतर्मुख करणारा ठरणार आहे. 

महोत्सवात आज 
स्क्रीन एक 
- दुपारी बारा ः वेनिला, स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट (मराठी) 
- दुपारी अडीच ः ट्रॅव्हलर (इराण) 
- सायंकाळी साडेसहा ः सायकल (मराठी) 
- रात्री नऊ ः डॉ. स्ट्रॅग्लोव्ह (युके) 

स्क्रीन दोन 
- सकाळी दहा ः आदिम विचार (ओडिया) 
- दुपारी बारा ः दि हंट (डेन्मार्क) 
- सायंकाळी साडेसहा ः ए क्‍युब ऑफ शुगर (इराण) 
- रात्री नऊ ः छोटा सिपाही (हिंदी) 

स्क्रीन तीन 
- सकाळी दहा ः ऑल दि बेस्ट (क्रोएशिया) 
- दुपारी बारा ः दि कल्पेबल (जर्मनी) 
- दुपारी अडीच ः 2001 ः अ स्पेस ओडीसे (युके) 

सायंकाळी पाच वाजता "महोत्सवांनी काय दिले' या विषयावर मुक्त संवाद 

Web Title: zp School educated people great