गळक्‍या छताखाली शाळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

मराठी शाळा टिकाव्यात, गुणवत्ता वाढावी अन्‌ मुलांची संख्याही वाढावी, याकरिता शासनाने पुढाकार घेतला. मात्र, महापालिका हद्दीतील जिल्हा परिषदेच्या देगाव व डोणगाव केंद्रातील आठ शाळा मागील ४० वर्षांपासून दान दिलेल्या जागांमध्येच भरतात. पावसाळ्यात या शाळांचे छत गळत असल्याने त्याला लागडी टेकण दिली आहेत. तरीही महापालिका वा जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी या शाळांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली नसल्याचे शिक्षक व मुख्याध्यापकांनी सांगितले.

सोलापूर - मराठी शाळा टिकाव्यात, गुणवत्ता वाढावी अन्‌ मुलांची संख्याही वाढावी, याकरिता शासनाने पुढाकार घेतला. मात्र, महापालिका हद्दीतील जिल्हा परिषदेच्या देगाव व डोणगाव केंद्रातील आठ शाळा मागील ४० वर्षांपासून दान दिलेल्या जागांमध्येच भरतात. पावसाळ्यात या शाळांचे छत गळत असल्याने त्याला लागडी टेकण दिली आहेत. तरीही महापालिका वा जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी या शाळांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली नसल्याचे शिक्षक व मुख्याध्यापकांनी सांगितले.

देगाव व डोणगावसह अन्य केंद्रांतील शाळांचीही दुरवस्था झाली आहे. नगरसेवकांची इच्छा असूनही शाळांसाठी निधी देता येत नाही. तर, शाळांच्या जागांचा कर महापालिका घेत असल्याने त्यांनीच खर्च करावा, अशी भूमिका जिल्हा परिषदेने घेतल्याची चर्चा आहे. या वादात मात्र मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असून, मुलांना जीव मुठीत धरून शिकावे लागत आहे. शाळेचा दर्जा सुधारावा, शाळा डिजिटल व्हावी, मुलांची पटसंख्या वाढावी, अशी इच्छा असूनही शिक्षकांना काहीच करता येत नसल्याने पटसंख्या कमी होत असल्याचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ZP School issue