‘झेडपी’च्या शाळा करा हस्तांतर

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 27 जुलै 2019

‘सीईओं’नी करावी कारवाई
ग्रामविकास विभागाने दिलेल्या या आदेशानुसार राज्यातील संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबतची कार्यवाही करायची आहे. या निर्णयामुळे शाळांच्या हस्तांतराचा वाद मिटला आहे.

सोलापूर - महापालिका हद्दीत शाळा आल्यानंतर ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे हस्तांतर सर्व मालमत्तेसह महापालिका व नगरपालिकांकडे करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळेवर कार्यरत शिक्षकांचे हस्तांतरही महापाहिला व नगरपालिकांकडे करण्यास सांगितले आहे. 

ज्या शाळा महापालिका हद्दीत हस्तांतरित होत आहेत, त्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या एकूण पदाचा आढावा घ्यावा. हद्दवाढीमुळे ज्या शाळा महापालिका क्षेत्रात गेल्या आहेत, महापालिकेच्या कोणत्या माध्यमाच्या शाळेस किती शिक्षकांची आवश्‍यकता आहे, हे पाहून त्यानुसार जिल्हा परिषदेकडे शिक्षक अतिरिक्त होत असल्यास त्या शिक्षकांच्या सेवा महापालिकेकडे हस्तांतरित कराव्यात, असेही शासनाने म्हटले आहे. या पदांवर शिक्षकांच्या सेवा हस्तांतरित करण्यासाठी सर्व शिक्षकांकडून विकल्प घ्यावेत, असे आदेशात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ZP School Transfer in Municipal Rural Development Department