पदाधिकारी बदलासाठी जगताप, खासदार आग्रही

ZP-Sangli
ZP-Sangli

सांगली - जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती बदलासाठी खासदार संजय पाटील, आमदार विलासराव जगताप यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. त्याबाबत आठवड्यात प्रमुख नेत्यांची बैठक घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. काठावरचे बहुमत आणि संग्रामसिंह देशमुख गटाकडून लॉबिंगची भीती असल्याने ‘ठंडा करके खाओ’ची भूमिका घेतली गेली आहे. सर्व सदस्यांना विश्‍वासात घेण्याची धडपड सुरू आहे. 

जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेनंतर संग्रामसिंह देशमुख यांना अध्यक्षपदी संधी मिळाली. शिवसेनेचे सुहास बाबर उपाध्यक्ष झाले. त्यांना सव्वा वर्षांसाठी संधी दिली जात असल्याचे नेत्यांनी आपापल्या इच्छुक समर्थकांना स्पष्ट सांगितले होते. त्याला सव्वा वर्षाहून अधिक काळ उलटल्याने इच्छुकांनी नेत्यांकडे तगादा लावला आहे. त्यांची अस्वस्थता वाढू लागल्याने नेत्यांनी बदलासाठी उचल खाल्ली आहे. 

खासदार पाटील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्याच्या राजकारणावर वरचष्मा राखू इच्छितात. त्यामुळे त्यांना अध्यक्षपदी संधी हवी असल्याची चर्चा आहे. त्यांच्या समर्थक गटातून त्यांचे चुलते डी. के. पाटील आणि सुरेंद्र वाळवेकर यांची नावे पुढे आणली गेली आहेत. आमदार जगताप यांनी जतला संधीची मागणी केली आहे. 

संग्रामसिंह देशमुख विधानसभा निवडणुकीत कडेगाव-पलूस मतदार संघातून उतरणार आहेत. ते जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष आहेत. विधानसभेच्या दृष्टीने मजबुतीसाठी पद कायम ठेवण्याचा आग्रह धरतील. त्यातून लॉबिंगचीही शक्‍यता आहे. या स्थितीत शिवसेनेला गृहीत धरून भाजप बदल करू शकणार नाही. आमदार अनिल बाबर यांनी याबाबत तूर्त बोलण्यास नकार दिला आहे.

जिल्हा परिषद राजीनामे आठवडाभरात होतील. सर्वांना संधी देण्याच्या धोरणामुळे सर्व पदाधिकारी बदलले जातील. पाच ते सहावेळा नगरसेवकपदावर असलेल्या संगीता खोत यांना भाजपमध्ये येताच महापौरपद मिळाले.
- खासदार संजय पाटील

जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पदाधिकारी बदलाबाबत सदस्यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. प्रमुख नेत्यांची येत्या आठवडाभरात बैठक होईल. त्यात सर्व सदस्यांना विश्‍वासात घेऊन निर्णय घेतला जाईल.
- आमदार विलासराव जगताप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com