जिल्हा परिषदेतील बदल्या मंगळवार, बुधवारी होणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

सोलापूर - जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विनंती व प्रशासकीय बदल्या होणार आहेत. त्याबाबतचे वेळापत्रक सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले आहे. आरोग्य विभागातील जवळपास सर्वच अधिकारी व कर्मचारी, तर ग्रामपंचायत विभागातील ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांच्या विनंती बदल्या होणार आहेत. या बदल्या मंगळवारी (ता. 16) व बुधवारी (ता. 17) होणार आहेत.

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या तालुकास्तरीय बदल्या 23 मे रोजी संबंधित पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी सांगतील त्या ठिकाणी होतील. ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांच्या बदल्या सकाळी नऊ ते 12 या वेळेत, तर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या दुपारी 12 ते सहा या वेळेत होतील, असेही सामान्य प्रशासन विभागाने म्हटले आहे.

Web Title: zp transfer tuesday & wednesday