पिंपरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या वतीने मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी (ता.29) दुपारी एक वाजता जाहीर झाला. यावर्षी पिंपरी-चिंचचवड शहराने दरवर्षीच्या तुलनेच्या निकालात उत्तुंग भरारी घेतली. शहराचा निकाल 98.49 टक्के लागला.
तब्बल दीड महिन्यानी उशिरा निकाल लागल्याने उत्कंठा दाटली होती. यावर्षीच्या निकालात 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुलामुलींनीही निकालात अव्वल बाजी मारली. मुलांचा निकाल 98.13 टक्के तर मुलींचा निकाल 98.89 टक्के लागला आहे.
शहरात दहावीच्या परीक्षेला 188 शाळांमधून एकूण 18306 विद्यार्थी बसले होते. यामध्ये 9627 मुले व 8679 मुली परीक्षेस बसल्या होत्या. त्यातून 9447 मुले व 8543 मुली उत्तीर्ण झाल्या. एकूण 18030 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लॅपटॉप व मोबाईलवरच बऱ्याच जणांनी निकाल पाहिला. ज्यांच्याकडे निकाल पाहण्याची सोय नव्हती, अशा विद्यार्थ्यांनी नातेवाईक मित्र मंडळींना फोन करून निकालाची ऑनलाईन प्रत मागितली. काही ठिकाणी सायबर कॅफेवर निकाल पाहण्यासाठी तुरळक गर्दी दिसली.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
लॉकडाउनमध्ये निकाल ऐकताच चांगल्या गुणांनी पास झालेल्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद तरळला. सर्वांनी सोशल मीडियावर पेढे भरवितानाचे फोटो शेअर केले. मित्र-मैत्रिणींनी लगेचच एकमेकांना फोन करून शुभेच्छा दिल्या. नातेवाईकांनी व्हिडिओ कॉल केले. सोशल मीडियावर शुभेच्छांचा धुमाकूळ दिसून आला. बऱ्याच जणांनी सेल्फी काढून आनंद व्यक्त केला. काहींनी निकालानांतर कोणत्या शाखेत प्रवेश घेणार? सध्याची परिस्थिती पाहता पुढील दिशा ठरिवण्याच्याही चर्चा घरोघरी रंगली. हॉटेल बंद असल्याने गोडधोडीचा बेतही घरीच फिक्स झाला. बऱ्याच जणांनी आपआपल्या शाळेतील विविध विषयांच्या शिक्षकांना कॉल केले. काहींनी थेट शाळेतील शिक्षकांच्या घरी मिठाई दिली.
गतवर्षीच्या तुलनेत 12 टक्क्यांची वाढ
गतवर्षी शहराचा निकाल 86.49 टक्के लागला होता. त्यामुळे यंदा निकालात 12 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसले. गतवर्षी निकालात 7. 84 टक्क्यांनी घट झाली होती. मुले 82.62 टक्के व 90.94 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या होत्या. तर 45 शाळांनी निकालाची शंभरी गाठली होती.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.