पिंपरी-चिंचवडमध्ये आज पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या अधिक

पिंपरी-चिंचवडमध्ये आज पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या अधिक

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 960 जणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे एकूण संख्या 27078 झाली आहे. आज 1121 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत 18794 जण बरे झाले आहेत. सध्या, 7824 जणांवर उपचार सुरू आहेत. आज शहरातील 16 व बाहेरील पाच, अशा 21 जणांचा मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या 460 झाली आहे.

आज मृत झालेले रुग्ण मोरवाडी (पुरुष 62 वर्षे), रहाटणी (स्री 65 वर्षे), वाल्हेकरवाडी (स्री 65 वर्षे), संत तुकाराम नगर (पुरुष 52 वर्षे), पिंपळे गुरव (स्त्री 60), मोशी (स्त्री 60, पुरुष 74 वर्षे), काळेवाडी (स्त्री 64 वर्षे), बिजलीनगर (स्त्री 65 वर्षे), नेहरूनगर पिंपरी (पुरुष 75 वर्षे), शिरूर (पुरुष 36 वर्षे), नारायणगाव (पुरुष 85 वर्ष), चाकण (पुरुष 44, स्त्री 35 वर्ष), येरवडा (पुरुष 74), थेरगाव (स्त्री 65 व पुरुष 48), दापोडी (स्त्री 70), रुपीनगर (पुरूष 70 व 45), दिघी (पुरुष 70 ) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com