पिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढविणारी बातमी; एकाच दिवशी कोरोनाचे...

पिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढविणारी बातमी; एकाच दिवशी कोरोनाचे...

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील संभाजीनगर, रुपीनगर, तळवडे, सांगवी आणि मोशी परिसरातील 11 आणि पुण्याच्या शिवाजीनगर परिसरातील एक, अशा 12 जणांना संसर्ग झाल्याचे मंगळवारी (ता. 5) आढळून आले. मंगळवारी सायंकाळी एनआयव्हीकडून आलेल्या रिपोर्टनुसार संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये दीड महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे.  त्यामुळे शहरातील 136 आणि महापालिका हद्दीबाहेरील 10, अशा 146 जणांवर शहरात उपचार सुरू आहेत. 

शहरातील 57आणि बाहेरील दोन असे 59 जण कोरोनामुक्त झाले असून, आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात पुण्यातील दोघांचा समावेश आहे. महापालिकेने तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांचा एनआयव्हीकडील अहवाल मंगळवारी आला. त्यानुसार दीड महिन्याची मुलगी, दोन वर्षांचा मुलगा, 61 वर्षीय पुरुष; रुपीनगर येथील 11 व 27 वर्षीय महिला, तळवडेतील 37 वर्षीय पुरुष, सांगवीतील 37 वर्षीय महिला व 74 वर्षीय पुरुष, मोशीतील एक व्यक्ती आणि शिवाजीनगर परिसरातील एक ज्येष्ठ महिला यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तर, खराळवाडी व दापोडी येथील व्यक्तींचे चौदा दिवस उपचारानंतरच्या तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, संभाजीनगर रस्ता, निगडी-भोसरी रस्ता, शिवाजी पार्क लिंक रस्ता, अंब्रेला गार्डन रस्ता, संत ज्ञानेश्वर हाउसिंग सोसायटी परिसर आणि मोशीतील बनकर वस्ती रस्ता, जाधववाडी रस्ता, नाशिक महामार्ग व मोशी हायस्ट्रीट रस्ता आजपासून सील करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com