पिंपरी-चिंचवड शहरातील आजचा मृत्यूचा आकडा धक्कादायक; शहरवासियांनो काळजी घ्या!

Biorepository to prevent epidemics like corona.jpg
Biorepository to prevent epidemics like corona.jpg

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात आज बुधवारी दिवसभरात 15 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. काल सायंकाळी सात ते आज रात्री साडेआठ वाजेपर्यंत 432 जणांचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह आले. तर 356 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत 5246 जण बरे झाले आहेत. सध्या 3176 जणांवर उपचार सुरू आहेत. 

पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णालयांत दाखल शहरातील 432 व शहराबाहेरील 19 असे 451 जणांचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह आले. आजपर्यंत एकूण मृतांची संख्या 187 झाली आहे. त्यात शहरातील 142 व शहराबाहेरील 45 जणांचा समावेश आहे. 

आज मृत झालेले रुग्ण रहाटणी (पुरुष,६९ वर्षे), भोसरी (पुरुष,७० वर्षे), भोसरी (पुरुष,७५ वर्षे), कासारवाडी (स्त्री,६८ वर्षे), अजंठानगर निगडी (स्त्री,६० वर्षे), दापोडी (पुरुष,७२ वर्षे), पिंपरी (पुरुष,६२ वर्षे), थेरगांव (पुरुष,७२ वर्षे), अजंठानगर चिंचवड (पुरुष,५५ वर्षे), पिंपरीगांव (परुष,७७ वर्षे), भोसरी (पुरुष,७३ वर्षे), थेरगांव (पुरुष,३६ वर्षे), भोसरी (स्त्री,५५ वर्षे), दापोडी (पुरुष,७६ वर्षे), औंधरोड (स्त्री,७३ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com