बापरे! पिंपरी-चिंचवडमध्ये आठ दिवसांत कोरोनामुळे एवढे मृत्यू 

टीम ई सकाळ
सोमवार, 29 जून 2020

  • गेल्या आठ दिवसांत 16 मृत्यू; एक हजार 144 रुग्णांची भर 
  • आज दुपारी चारपर्यंत आढळले तब्बल 174 रुग्ण 

पिंपरी : शहरात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत आहे. जून महिन्यात रुग्णवाढीचा वेग व मृत्यूदरही सर्वाधिक राहिला आहे. विशेषतः दाट लोकवस्तीच्या भागात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवड्यात सोमवारी (ता. 22) सकाळी एक हजार 768 असलेली रुग्णसंख्या सोमवारी (ता. 29) दुपारी चारपर्यंत दोन हजार 910 झाली. म्हणजेच आठ दिवसात तब्बल एक हजार 142 रुग्ण वाढले. तर, गेल्या सोमवारी सकाळपर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, त्या दिवशी चौघांचा मृत्यू झाला होता. आज ही संख्या 45 झाली आहे. म्हणजेच आठ दिवसांत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

 हेही वाचा-  Breaking : भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना कोरोना

कोरोनाचा पहिला रुग्ण 11 मार्च रोजी शहरात आढळला. तेव्हापासून सोमवारी (ता. 29) दुपारी चारपर्यंत एकूण रुग्णसंख्या दोन हजार 910 झाली होती. यात आज आढळलेल्या 174 जणांचाही समावेश आहे. 11 मार्च ते 31 मे या 82 दिवसात 566 रुग्ण आढळले होते. यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला होता. तर, एक जून ते 29 जून (दुपारी चार वाजेपर्यंत) या 29 दिवसांत 2344 रुग्ण वाढले. त्यापैकी 37 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी चारपर्यंत 174 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- पिंपरी-चिंचवड : आज दुपारपर्यंत १५७ नवे पॉझिटिव्ह, तर बरे झालेले रुग्ण म्हणतायेत

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

  1. झोपडपट्टी, चाळी व दाट लोकवस्तीमध्ये घरांचा आकार लहान व एकमेकाला लागून असल्याने सोशल डिस्टंसिंग पाळण्यात अडचणी आहे. 
  2. झोपडपट्ट्यांमध्ये मास्क व साबन वाटप केले आहे. फ्लू क्‍लिनिक व मोबाईल लॅबद्वारे तपासणी केली आहे. 
  3. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर पाचशे रुपये व थुंकल्यास दीडशे रुपये दंडाची आकारणी केली जात आहे. 
  4. पावसाळा असल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना किमान दोन मास्क सोबत ठेवावेत, ओला मास्क वापरू नये. सार्वजनिक ठिकाणी व घरामध्येसुद्धा मास्क वापरा. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मृत्यूची कारणे 

प्रतिकार शक्ती कमी असलेले, फुफ्फूस, हृदयविकार, मधूमेह, रक्तदाब, कर्करोग, किडनी विकार असे गंभीर आजार असलेल्या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. शिवाय, काही रुग्ण मृत्यू होण्यापूर्वी अवघे काही तास अगोदर रुग्णालयात दाखल झाले होते. 

मृत्यू दर कमी करण्यावर भर दिला आहे. जूनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. आजपर्यंत एक दिवसाच्या आता केवळ एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अन्य व्यक्तींवर उपचार करून त्यांना वाचविण्याचा कसोशिने प्रयत्न केलेला आहे. परंतु, दुर्धर आजार व कमी प्रतिकार शक्ती यामुळे त्यांचा बळी गेला आहे. नागरिकांनी अंगावर आजार काढू नये. लक्षणे दिसताच रूग्णालयात दाखल व्हावे. 

- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका

बरे झालेले रुग्ण म्हणाले : बरा होणारा आजार 

फेसशिल्ड, मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्हज वापरून रुग्णांची तपासणी करत होतो. परंतु, कोरोनाच संसर्ग कसा झाला हे समजलेच नाही. उपचारानंतर पूर्णपणे बरे झालो आहे. सर्वांनी पुरेशी दक्षता घेऊन कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे. इतर आजारांप्रमाणेच हा विषाणूजन्य आजार आहे. त्यामुळे समाजाने कोरोनाबाधित रुग्णांना भेदभावपूर्ण वागणूक देऊ नये, असे मोशी-प्राधिकरणातील एका डॉक्‍टरांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 deaths in the last eight days in pimpri chinchwad